आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेट कॉलिंगला कंपन्यांचा विरोध; ट्रायकडून नेट कॉल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंटरनेट आधारित कॉलिंग आणि मेसेजिंगचे नियम ठरवण्याची प्रक्रिया ट्रायने सुरू केली. त्यासाठी सर्व संबंधितांकडून सूचना मागवल्या.सध्या स्काइप, व्हायबर, व्हॉट्सअॅप व गुगल टॉकवर अशी सेवा उपलब्ध आहे. त्यांना ओव्हर द टॉप (ओटीटी) कंपनी म्हटले जाते. त्यांच्या या सेवांना दूरसंचार कंपन्यांकडून विरोध होत आहे. या सेवांमुळे त्यांच्या कमाईवर विपरीत परिणाम होत असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. ओटीटी सेवा नियमित करण्यासंबंधी जगभर विचारविनिमय सुरू आहे.

सध्या ग्राहक इंटरनेट कनेक्शन आणि अॅपच्या माध्यमातून या सेवांचा लाभ घेत आहेत. त्यांना कॉल किंवा मेसेजसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाहीत. केवळ इंटरनेट चार्जेसच द्यावे लागतात. काही दिवसांपूर्वी एअरटेलने इंटरनेटआधारित सेवांसाठी वेगळ्या शुल्काची घोषणा केली होती. मात्र, त्याला तीव्र विरोध झाल्यामुळे ते परत घेतले होते. ट्रायचे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी तेव्हाच या सेवांच्या नियमनाचा मुद्दा उपस्थित केला होता.

>व्हॉट्सअॅप : भारतात ७ कोटी युजर्स. फ्री डाऊनलोड. विकसित देशांमध्ये व्हॉट्सअॅपसाठी वर्षाला डॉलर
(६२ रुपये) द्यावे लागतात.
> मेसेजिंग अॅप : ट्रायच्या मते व्हॉट्सअॅप सर्वात आघाडीवर. त्यानंतर फेसबुक मेसेंजर, स्काइप, वुई चॅट आणि व्हायबरचा क्रमांक लागतो.
>स्काइप : २०१३ मध्ये जगभरात स्काइपद्वारे २१४ अब्ज मिनिटे आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...