आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस चेन: मॉल्स अन् डेली नीड्स शॉपीत संत्र्यांची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सध्या शेतकरी ते थेट ग्राहक अशी संत्र्यांची िवक्री सुरू अाहे. मात्र, येणाऱ्या काही दिवसांत संत्रा िवक्रीची साखळी निर्माण करायची असून माॅल्स आणि डेली नीड्स शाॅपीतूनही संत्र्यांची िवक्री करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे (समृद्धी) प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांनी दिली.

समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर आमचा भर आहे. सध्या थेट विक्री सुरू असली तरी भविष्यात स्थानिक पार्टनर शोधून िवक्री साखळी करण्याचा मानस आहे. त्यायोगे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कायम िवक्रीसाठी ठिकाण मिळेल त्याची भटकंती थांबेल, असे आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या वर्षी संत्रा पिकावर मोठे संकट आले. कांदा, ऊस कापूस उत्पादक शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पाऊय, गारपीट दुष्काळामुळे हवालदिल झाला. संत्रा उत्पादक शेतकरीही यातून सुटला नाही. संत्रा अक्षरश: मातीमोल भावात विकण्यात आला. व्यापाऱ्यांनी कुठे दोन ते पाच, तर कुठे पाच ते सात रुपये किलोने विकण्याची तयारी दाखवली. पण शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आणि समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्य आणि देशातील प्रमुख शहरांतून संत्र्याची िवक्री सुरू झाली. आज औरंगाबाद, नाशिक, बंगळुरू, ठाणे, सातारा, मुंबई, पुणे, हैदराबाद, सोलापूर, कोलकाता, इंदूर भोपाळ येथे समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विक्री सुरू असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

अशी केली जाते संत्रा विक्रीला मदत
स्थानिक प्राधिकरण वा स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी विभाग तसेच शासनाच्या अन्य यंत्रणांच्या मदतीने शेतकऱ्याला संत्रा विक्रीसाठी जागा मिळवून देणे, िवक्रीच्या शहरात मोफत वा नाममात्र शुल्क आकारून निवास व्यवस्था करणे, वजन-काटे, क्रेटचा पुरवठा आणि सवलतीच्या वा माफक दरात वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याची मदत समृद्धी प्रकल्पातून केली जाते.