आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Other OPEC Countries, Except For 'Crude'spiraling Production, Grew By 15 Per Cent Rate In Ten Days

ओपेक वगळता इतर देश ‘क्रूड’ उत्पादन घटवणार, दहा दिवसांमध्ये तब्बल 15 टक्क्यांनी वाढले आहेत दर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/व्हिएन्ना : कच्च्या तेलाचे भाव मागील १० दिवसांमध्ये जवळपास १५ टक्क्यांनी वाढले आहेत. ओपेक आणि नॉन-ओपेक देश जानेवारी महिन्यापासून उत्पादन घटवणार आहेत. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरजेच्या तुलनेत भारत ८० टक्के क्रूड ऑइल आयात करते. त्यामुळे भारताला याचा फटका बसू शकतो.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडची किंमत प्रतिबॅरलमागे ५५ डॉलर आहे. पुढील वर्षापर्यंत हेच दर ७० डॉलरपर्यंत जाऊ शकतात. क्रिसिल संस्थेच्या सर्वेक्षणानुसार क्रूड ऑइल ६० डॉलरपर्यंत गेल्यास मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे ८० रुपये आणि डिझेलचे दर ६८ रुपयांपर्यंत जाऊ शकतात. जर क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरलमागे ७० डॉलरवर गेल्यास पेट्रोलचे दर ९० रुपये आणि डिझेलचे दर ७५ रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
वास्तविक पाहता सरकार करांमध्ये कपात करणार असल्याने दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. सध्या पेट्रोलवर प्रति लिटरमागे २१.४८ रुपये तर डिझेलवर १७.३३ अबकारी कर लावला जातो. वर्षभरात पेट्रोलवर १९.०६ रुपये आणि डिझेलवर १०.६६ रुपये कर लावण्यात आला होता.

कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या ११ नॉन ओपेक देशांनी ५,५८,००० बॅरलने उत्पादन घटवण्यास तयारी दर्शवली. १३ देशांचा समावेश असणाऱ्या ओपेकने ३० नोव्हेंबरला १२ लाख बॅरलने उत्पादन कमी करणार असल्याची घोषणा केली होती. नॉन ओपेक देश तयार असल्याने सौदी अरेबियाने उत्पादनात आणखी घट करण्याची तयारी चालवली आहे.

पुढील वर्षी वाढणार दर
पुढील वर्षी क्रूड ऑइल २५ टक्के महाग होऊ शकते. क्रूड ऑइलचे दर ७० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचावेत, असे सौदी अरबला वाटत आहे. जर दर वाढले तर अमेरिकेत शेल ऑइलचे उत्पादन वाढू शकते.
शेल ऑइलशी स्पर्धा करण्यासाठी सौदीने पुरवठा वाढवला होता. त्यामुळे दर खाली आले होते. २०१४ च्या मध्यापर्यंत क्रूड ऑइलचे दर ११५ डॉलर प्रति बॅरलवर होते, परंतु पुरवठा वाढल्याने दर ३० डॉलर प्रति बॅरलपर्यंत आले होते.
बातम्या आणखी आहेत...