आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मित्रांनी रोवला या कंपनीचा पाया, एक होता भारतीय तर दुसरा पाकिस्तानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः चेन्नई येथील 'महिंद्रा अँड महिंद्रा' च्या ऑफिसवर लावण्यात आलेला रुफटॉप सोलार प्लांट

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर बंदूकीच्या गोळ्या आणि बॉम्बच्या आवाज हे नेहमीचेच झाले आहेत. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतातील एक खुप मोठी आणि प्रसिध्द कंपनी असलेली 'महिंद्रा अँड महिंद्रा' (एमअँडएम) चा पाया अशा दोन मित्रांनी रोवला आहे, ज्यातील एक भारतीय तर दुसरा पाकिस्तानी आहे. नुकतेच फ्रेंडशिप-डे झाला आहे. यानिमित्ताने दै. दिव्य मराठी तुम्हाला या मित्रांबद्दल आणि त्यांनी सुरू केलेल्या कंपनीबद्दल अत्यंत रोचक अशी माहिती देणार आहे.

पाकिस्तानी गुलाम मोहम्मदने केली होती पायाभरणी
1945 ला भारत जेव्हा अखंड होता तेव्हा लुधियानामध्ये दोन भाऊ केसी महिंद्रा, जेसी महिंद्रा आणि मालक गुलाम मोहम्मदने महिंद्रा अँड मोहम्मद या नावाने कंपनीची पायाभरणी केली होती. भारत स्वातंत्र झाल्यानंतर आणि पाकिस्तान बनल्यानंतर गुलाम मोहम्मद पाकिस्तानात निघून गेले आणि तेथील ते पहिले अर्थमंत्री बनले. त्यानंतर 1948 ला या कंपनीचे नाव बदलून 'महिंद्रा अँड महिंद्रा' करण्यात आले. मोहम्मद हे पाकिस्तानात स्थायिक झाल्यानंतर या कंपनीचा विकास हळूहळू वाढत गेला. 1991 मध्ये आनंद महिंद्रा हे या ग्रुपचे डेप्यूटी डायरेक्टर बनले. तेव्हापासून आतापर्यंत महिंद्रा समुहने अनेक यशोशिखरे पार केली असून अजूनही त्यांची घोडदौड कायम आहे.

1.80 लाख पेक्षा जास्त लोक करतात काम
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सध्या महिंद्रा ग्रुपमध्ये 1.80 लाखपेक्षा जास्त लोक काम करत आहेत. आज कंपनीची मार्केट व्हॅल्यू जवळपास 84,567 कोटी रुपये एवढी आहे. 1991 मध्ये आनंद महिंद्रा यांनी या ग्रुपची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर या कंपनीने जगभरात आपला विस्तार वाढवला आहे. कंपनीच्या या यशस्वी 24 वर्षांच्या काळात महिंद्रा यांनी अनेक चढ उतार पाहिले आहेत.

'महिंद्रा अँड महिंद्रा':
मागिल एका आठवड्यात शेयर 2.06 टक्के, तर एका महिन्यात कंपनीचा शेयर 4.9 टक्क्याने वाढला आहे. तीन महीन्यात या कंपनीच्या शेयर्सने 18.7 टक्के रिटर्न दिला आहे. तर मागील एका वर्षात कंपनीच्या शेयर्समध्ये 16 टक्के वाढ झाली आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आनंद महिंद्रा यांनी कसा बदलला कंपनीचा चेहरा...