आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Paytm ने 2% शुल्क लावण्याचा निर्णय अवघ्या 24 तासात मागे घेतला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नविन नियम 8 मार्च पासून लागू करण्यात आले आहे. - Divya Marathi
नविन नियम 8 मार्च पासून लागू करण्यात आले आहे.
नवी दल्ली- क्रेडीट कार्डव्दारे Paytm मध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय 24 तासांतच मागे घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यूजर्सनी नाराजी व्यक्त केल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे.

अनेक यूजर्स पेटीएमचे क्रेडीट मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत होते. तसेच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेटीएममध्ये जमा केलेले पैसे कोणतेही शुल्क न भरता बँक खात्यात ट्रान्सफर करत होते.

पेटीएममध्ये जमा केलेले पैसे परत बँक खात्यात जमा करण्यावर कोणतेही शुल्क लागत नाही. पण अशा प्रकारच्या व्यवहारामुळे कंपणीला शुल्क भरावे लागते, असे पेटीएमने एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे. या व्यवहारांमुळे कंपनीला नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे कंपनीने 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा काल निर्णय घेतला होता. पण चौफेर टीका झाल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...