आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Paytm चे पेमेंट बँक सुरु; 25 हजार डिपॉझिट केल्यास मिळेल 250 रुपयांचा कॅशबॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डिजिटल पेमेंट्‍स कंपनी 'पेटीएम'ने आज (मंगळवारी) पेमेंट्‍स बॅंक लॉन्च केली. बॅंक आपल्या ग्राहकांना डिपॉझिट केलेल्या रकमेवर 4 टक्के व्याजासोबतच 250 रुपये कॅशबॅकही देईल.
पेटीएम बॅंकेत खाते उघडून त्यात 25 हजार रुपये डिपॉझिट केल्यास ग्राहकाला 250 रुपये कॅशबॅक स्वरुपात मिळतील.

ऑनलाइन ट्रान्सझेक्शनवर ग्राहकांकडून कोणताही शुल्क आकारले जाणार नाही. त्याचबरोबर खातेदारांना मिनिमम बॅलेंस ठेवण्याचेही निर्बंध लावण्यात येणार नाही. पेटीएम बॅंकेने 2020 पर्यंत 50 कोटी ग्राहक बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  

असे उघडता येईल खाते...
-पेटीएमने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगितले आहे की, वॅलेटमध्ये ठेवलेला पैसा पेटीएम पेमेंट बॅंक लिमिटेडमध्ये  (पीपीबीएल) टान्सफर करण्यात येईल.
- पेटीएमकडे सध्या जवळपास 22 कोटी ग्राहक आहेत. ते डिजिटल वॉलेटचा वापर करतात.
- ग्राहकाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नंतर त्यांचे खाते उघडले जाईल.
बातम्या आणखी आहेत...