आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल दरात वाढ, पेट्रोल 1.34 तर डिझेल 2 रुपये 37 पैशांनी महाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल दरात 1 रुपया 34 पैशांची वाढ केली असून डिझेलच्या दरात 2 रुपये 37 पैशांनी वाढ केली आहे. नवी दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 64.21 रुपयांवरून 65.55 रुपये लिटर असा असेल तर 1 लिटर डिझेलसाठी 52.59 रुपयांऐवजी 54.96 रुपये मोजावे लागतील. नवे दर आज (शनिवारी) मध्यरात्रीपासून लागू करण्‍यात येणार आहेत.

सलग चौथ्यांदा वाढले पेट्रोलचे दर
- पेट्रोल दरात सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यावेळी पेट्रोलचा दर 1 रुपया 34 पैशांनी वाढवला आहे.
- या पूर्वी 1 ऑक्टोबरला 58 पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी 15 सप्टेंबरला दर वाढवण्यात आले होते. 31 ऑगस्टला पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपय 38 पैशांची वाढ करण्यात आली होती.
- यावेळी डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त वाढवण्यात आला आहे. डिझेलमध्ये 2 रुपये 37 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, देशातील प्रमुुख शहरांंमध्येे कसे राहातील पेट्रोलचे नवे दर...
बातम्या आणखी आहेत...