आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल 3 तर, डिझेल 2 रुपयांनी महागले, मध्यरात्रीपासून नवीन दर लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेट्रोल 3.07 रुपये आणि डिझेल 1.90 रुपये प्रतीलिटर या दराने महागले आहे. ही नवीन दरवाढ बुधवारी मध्‍यरात्रीपासून लागू होणार आहे. दिल्लीमध्‍ये पेट्रोल 56.61 रुपयांऐवजी आता 59.68 रुपये या दराने मिळणार आहे. तर, डिझेल 46.43 रुपये लिटर मिळत होते. नवीन दरांप्रमाणे 48.33 रुपयात डिझेल मिळणार आहे.
4 मोठ्या शहरांमध्‍ये काय असतील पेट्रोल डिझेलचे दर..
- दिल्लीमध्‍ये पेट्रोल 56.61 रुपये प्रतिलिटर ऐवजी 59.68 प्रतिलिटर या दरात मिळेल.
- मुंबईत गुरुवारपासून प्रतिलिटर पेट्रोलसाठी 62.75 ऐवजी 65.79 रुपये मोजावे लागतील.
- कोलकातामध्‍येही एक लिटर पेट्रोलसाठी 61.35 ऐवजी 63.76 रुपये खर्च करावे लागतील.
- चेन्नईमध्‍ये प्रतिलिटर पेट्रोलचे दर 56.07 रुपयांऐवजी 59.13 रुपये असतील.
या शहरांमध्‍ये काय असतील डिझेलचे भाव
- दिल्ली: 46.43 रुपयांऐवजी 48.33 रुपये.
- कोलकाता: 49.14 रुपयांऐवजी 50.75 रुपये.
- मुंबई: 53.06 रुपयांऐवजी 55.06 रुपये.
- चेन्नई: 47.13 रुपयांऐवजी 49.09 रुपये.
(वरील सर्व दरवाढ ही प्रतिलिटरप्रमाणे आहे.)
बातम्या आणखी आहेत...