आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांच्या खिशाला चाट, पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ, वाचा काय होईल परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सलग चार वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल तब्बल 3 रुपये 38 पैशांनी महागले आहे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 67 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. नवे दर आज (गुरुवारी) मध्यरात्रीपासून लागू करण्‍यात आले आहे.

हेही वाचा....पेट्रोल पंपावर अशी होते फसवणूक, तुमच्या समोरच मारतात 'काटा', असा करा बचाव
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने सणासुदीच्या दिवसांमध्ये सामान्यांच्या खिशाला मात्र चाट बसणार आहे.

दरम्यान, तब्बल अडीच महिन्यांनतंर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 16 जूनला पेट्रोलच्या दरात 5 पैसे तर डिझेलच्या दरात 1 रुपया 26 पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, सलग चार वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करर्‍यात आली होती. परिणामी गेल्या अडीच महिन्यात पेट्रोल 5 रुपये 56 पैशांनी तर डिझेल 4 रुपये 92 पैशांनी स्वस्त झाले होते.

'क्रूड'चे दर वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ...
- ऑगस्टमध्ये ब्रेंट क्रूड 18 टक्क्यांनी माहागले होते. 1 ऑगस्टला क्रूडचा दर 42.14 डॉलर प्रति बॅरल होते. 30 ऑगस्टला क्रूडचा दर 49.70 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास ट्रेड करत होता. सध्या क्रूडचा दर 50.89 हॉलर प्रति बॅरल आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, देशातील प्रमुुख शहरांंमध्येे असे राहातील पेट्रोलचे नवे दर...Expert View... आणि काय होईल दरवाढीचा परिणाम...?
बातम्या आणखी आहेत...