आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P&G Says Its Stop Selling Vicks Action 500 Extra\' With Immediate Effect

‘वि‍क्‍स अॅक्‍शन 500 एक्‍स्‍ट्रा’ची विक्री बंद, P&G चा निर्णय; Corexला मात्र दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- एफएमसीजी कंपनी 'प्रॉक्‍टर अॅण्‍ड गॅम्बल'ने (P&G) आपला बहुचर्चित ब्रँड ‘वि‍क्‍स अॅक्‍शन 500 एक्‍स्‍ट्रा’ टॅबलेटची विक्री तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारद्वारा नुकताच 344 औषधांवर बंदी घातल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, 'फायझर' कंपनीचे कफ सि‍रप 'कोरेक्‍स'ला दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. कोरेक्सवर सरकारने बंदी घातली होती. मात्र, दि‍ल्‍ली हायकोर्टाने 'कोरेक्स'च्या बंदीचा सरकारचा निर्णय स्थगित केला आहे. दरम्यान, फायझरने सरकारच्या बंदीच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते.

‘वि‍क्‍स अॅक्‍शन 500 एक्‍स्‍ट्रा’ ही टॅबलेट डोकेदुखी, सर्दी व खोकल्यावर औषध म्हणून वापरले जाते. पॅरासिटामॉल, फेनिलफ्राईन व कॅफिन औषधांच्या एकत्रीकरणातून ‘विक्स अॅक्शन 500 एक्स्ट्रा‘ तयार केली जाते. ही टॅबलेट एक प्रतिबंधित औषधांत कोडीन आधारित एफडीसी (फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन) असल्याचा दावा पी अॅण्ड जी कंपनीने केला आहे. दरम्यान, सरकारने प्रतिजैविक आणि वेदनशामक औषधांसह एकूण 344 औषधांवर नुकतीच बंदी घातली होती.

फायझर, अबॉटनंतर इतर कंपन्यादेखील जाणार कोर्टात...
सरकारच्या या निर्णयाला 'फायझर'ने दिल्ली हायकोर्ट कोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाने सोमवारी फायझरच्या बाजूने निकाल दिला. आज, मंगळवारी अबॉटच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे औषध निर्मात्या कंपन्यांचे कोट्यवधींने नुकसान झाले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 350 औषधांवर बंदी; वैद्यकीय उपयोग न आढळल्याने केंद्राची कारवाई