आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळांची संख्या दुप्पट वाढेल : सिन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - देशात दोन ते तीन वर्षांत विमानतळांची संख्या दुपटीने वाढणार असल्याचे मत उड्डयण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले आहे. ते तिसऱ्या जी. रामचंद्रन स्मारक व्याख्यानात बोलत हाेते. सध्या देशात ७५ विमानतळांचा वापर होत आहे. १० वर्षांत चार एअरपोर्ट हब विकसित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्यातरी इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने दिल्ली विमानतळ सर्वात पुढे आहे. येथे लवकरच आणखी एक रनवे सुरू करण्यात येणार आहे. चेन्नईला देखील जागतिक पातळीवरील विमानतळ बनवण्याचे काम सुरू आहे. बंगळुरू आणि कोलकाता येथील विमानतळाचा देखील आणखी विकास करण्यात येणार आहे.

हवाई प्रवासाला अधिक सुखद आणि स्वस्त करण्यासाठी सरकारच्या वतीने एक जुलै रोजी नवीन आराखडा जाहीर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यानुसार नवीन शहरांना जोडणाऱ्या एक तासाच्या विमान प्रवासासाठी २,५०० रुपयांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. अल्पविकसित स्थानिक मार्गांचा विकास करण्याचा या आराखड्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...