आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब लाकडावर स्वयंपाक करण्यास असहाय : मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : ऊर्जा पोहोचण्याबाबत श्रीमंत-गरीब हा भेदभाव संपवणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एकीकडे श्रीमंत लोक हायब्रीड कार खरेदी करत आहेत, तर दुसरीकडे गरीब लाकडावर स्वयंपाक करण्यास असहाय असल्याचे मत त्यांनी सोमवारी येथे आयोजित ‘पेट्रोटेक-२०१६’ संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. या दोन्हीमधील अंतर कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. देशात ३० कोटी नागरिक अजूनही विजेपासून वंचित आहेत.
मार्च २०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कच्च्या तेलाचे भारतातील उत्पादन वाढवण्यावर तसेच २०२२ पर्यंत आयात १० टक्के कमी करण्याच्या उद्दिष्टावर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी इतर देशांमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे भारताच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. कच्च्या तेलाचे उत्पादन देश आणि खरेदी करणारे देश यांच्यादरम्यान संतुलनाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या आेपेकने २००८ नंतर पहिल्यांदाच उत्पादनात घट केली आहे. गेल्या आठवड्यातच या देशांनी दररोज १२ लाख बॅरल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे ओपेक संघटनेत समावेश नसलेलेदेखील ६ लाख बॅरलने उत्पादन कमी करण्यास तयार झाले आहेत. त्यानंतर कच्च्या तेलाचे तर ५४.५६ डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

कच्च्या तेलाचे दर २०१४-१५ पासून सलग कमी होत होते. यामुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. सरकारनेही यावरील शुल्क वाढवून उत्पन्न वाढवले आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतात तेलाची सर्वाधिक विक्री होते. येथे दररोज ४३ लाख बॅरल कच्च्या तेलाची आवश्यकता असते. जगातील एकूण विक्रीच्या तुलनेत हा आकडा पाच टक्केदेखील नाही.
महागड्या कच्च्या तेलामुळे भारताच्या विकासावर
परिणाम होण्याची शक्यता : पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान
केअर्न ३ वर्षांत करेल ३०,००० कोटींची गुंतवणूक
तेल व गॅस उत्पादनाची क्षमता प्रतिदिवस एक लाख बॅरलपर्यंत वाढवण्यासाठी तीन वर्षांत केअर्न इंडिया ३०,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कच्च्या तेलाची किंमत ५० डॉलर झाल्यानंतर रॉयल्टी, कर, सेस व नफ्याच्या स्वरूपात ४३ डॉलर सरकारला जात असल्याचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितले. कंपनीला प्रतिबॅरल ७ डॉलर भेटतात. केअर्नचे विलीनीकरण वेदांतामध्ये होण्यासाठी मार्चपर्यंत वेळ लागेल. केअर्नजवळ २३,२९० कोटी रुपयांचा नगदी निधी आहे. त्याचा वापर वेदांता कर्ज फेडण्यासाठी करू इच्छिते. वेदांतावर ७७.९५२ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
भारतीय अर्थव्यवस्था २०४० मध्ये पाचपटीने वाढेल
- त्या वेळी तेलाची विक्री पूर्ण युरोपपेक्षा जास्त होईल. व्यावसायिक वाहनांची संख्या सध्याच्या १.३ कोटीच्या तुलनेत ५.६ कोटी होईल.
- २०३४ पर्यंत विमाननमध्ये भारत जगातील तिसरा मोठा बाजार होईल, यात इंधनाचा वापर चार पटीने वाढेल.
- २०४० मध्ये जीडीपी १० लाख कोटी डॉलरचा होईल. २०२२ मध्ये जीडीपीमध्ये उत्पादनाचा हिस्सा २५ टक्के हाेईल.

७७% पेट्रोल पंप शहरांमध्येच : गोयल
देशभरात सध्या ५३,२२१ पेट्रोल पंप आहेत. विशेष म्हणजे या एकूण पेट्रोल पंपांपैकी ४१,१४० पेट्रोल पंप हे शहरी भागातच आहेत. वीज मंत्री पीयूष गाेयल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित नसल्यामुळे ते प्रश्नांची उत्तरे देत होते.
बातम्या आणखी आहेत...