आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्त्रोद्योग, हायब्रीड कारवर चर्चेची शक्यता; जीएसटी परिषदेची पाच ऑगस्ट रोजी बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या पुढील बैठकीमध्ये विविध उद्योग संघटनांच्या वतीने मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. केंद्रीय उत्पादन तसेच सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीईसी) प्रमुख वजना एन. सरना यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करासंबंधात विविध क्षेत्रांतून अनेक मागण्या करण्यात आल्या असल्याचे त्यांनी शुक्रवारी उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमात सांगितले. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेची पुढील बैठक ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ही नवीन करप्रणाली लागू झाल्यानंतरच्या स्थितीवरही समीक्षा करण्यात येईल. वस्त्रोद्योग क्षेत्राने जीएसटीच्या दरामुळे चिंता व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सरना यांनी म्हटले आहे. जीएसटीसारख्या करप्रणालीच्या अंमलबजावणीची सुरुवात झाल्यानंतर काही अडचणी  येणे स्वाभाविक असल्याचे सरना यांनी सांगितले. हायब्रीड कारवरील ४३ टक्के जीएसटीचाही उद्योग  जगताने विरोध केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...