आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानित घरगुती सिलिंडर 2 रुपयांनी महाग, जुलैपासून सलग 8 वेळेस सिलिंडरच्या दरात वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने सबसिडी असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये  दोन रुपयांनी वाढ केली आहे. जेट फ्यूल म्हणजेच ATF (Aviation Turbine Fuel)च्या दरामध्ये 8.6% टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. फ्यूलचे भाव वाढल्यामुळे विमान प्रवास महाग होऊ शकतो.

सलग आठव्यांदा वाढ
- आतापर्यंत सबसिडी असलेले सिलिंडर (14.2 किलोग्रॅम)चे दर 432.71 रुपये असे होते. दोन रुपयाची वाढ झाल्यामुळे आता याची किंमत 434.71 रुपये होईल.
- विशेष म्हणजे, जुलैपासून सबसिडी असलेल्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये 8 वेळेस वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एक डिसेंबरला 2.07 रुपये प्रति सिलिंडर वाढवण्यात आले होते.

एटीएफमध्ये 4161 रुपयांची वाढ 
- ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी यावेळेस एअर टरबाइन फ्यूल म्हणजे विमान इंधनामध्ये मोठी वाढ 8.6% टक्क्यांनी वाढ केली आहे.
- यापूर्वी डिसेंबर 2016 मध्ये 3.7 टक्क्यांनी घट करण्यात आली होती. एटीएफ फ्यूलची दिल्लीमध्ये किंमत  4161 रुपए प्रति किलोलीटर (1000 लीटर) वाढून 52540.63 रुपए प्रति किलोलीटर झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...