आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी, बच्चन व तेंडुलकर फॅमिलीतील सदस्य पितात या हायटेक डेअरीचे दूध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंचर येथे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म आहे. ही डेअरी हायटेक असून येथील ‘प्राइड ऑफ काउ’चे दूध 80 रुपये लिटर आहे. मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर सारख्या सेलेब्रिटींसह या डेअरीचे 12000 ग्राहक आहेत. डेअरीत 3500 गायी आणि त्यांची देखरेख करण्यासाठी 75 कर्मचारी आहेत.

फार्मचे मालक देवेंद्र शहा यांनी ते देशातील सगळ्यात मोठा गवळी असल्याचा दावा केला आहे. कपड्यांचा व्यवसाय सोडून त्यांची दूधाचा व्यवसाय सुरु केला. आमच्या भागात दूध वाटप कधीपासून सुरु करतात , असे स्वत: सेलेब्रिटी फोन करून देवेंद्र शहा यांना विचारतात.

देवेंद्र शहा यांनी ‘भाग्यलक्ष्मी डेअरीची सुरवात एक एक मॉडेल फार्मच्या धर्तीवर केली होती. शहा म्हणाले की, 90 च्या दशकात सरकारने 'मिल्क हॉली डे'ची घोषणा केली तेव्हा, मंचरमधील शेतकरी दूध गोबर गॅस प्लांटमध्ये फेकत होते. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे आम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये दूध ठेवण्यास सुरुवात केली. नंतर दूध शहरात विक्रीसाठी पाठवणे सुरु झाले. एक महिनेत 20 ते 40 हजार लिटर दूध येऊ लागले. नंतर हळूहळू मिल्क प्रॉडक्ट्स बनवून ते एक्सपोर्ट करण्यास सुरवात झाली. 'गोवर्धन' या ब्रॅंड नेमने मिल्क प्रॉडक्टची विक्री केली जाते.

‘प्राइड ऑफ काउ’ प्रॉडक्टचे सुरवातील 175 ग्राहक होते. मात्र, आज मुंबई आणि पु्‍ण्यातील ग्राहकांची संघ्या 12 हजारांवर पोहोचली आहे. ट्रेडिंगचे चांगले काम सोडून दूधाचा बिझनेस सुरु केल्यामुळे लोक माझ्यावर हसतात. परंतु, देशातील सगळ्यात मोठा गवळी असल्याचा मला अभिमान असल्याचे देवेंद्र शहा सांगतात.

'आरओ'चे पाणी पितात गायी...
गायीसाठी पसरवण्यात आलेले रबर मॅट दिवसातून तिनदा बदलण्यात येते. विशेष म्हणजे येथील गायी आरओचे पाणी पितात. म्युझिक 24 तास सुरुच असते. गायींना सोयाबीन, अल्फा घास, हंगामी भाज्या मक्का खाऊ घातला जातो. गायींचे पोट साफ करण्‍यासाठी त्यांना हिमालय ब्रँडच्या आयुर्वेदिक औषधी दिल्या जातात. गायींना दिल्या जाणार्‍या खुराकमुळे दूधमधील फॅट कंट्रोलमध्ये राहातात.

कॅनडातील न्युट्रीशियन एक्सपर्ट डॉ.फ्रँक दर तीन महिन्यांनी येथे येतात. हवामानाच्या हिशेबाने गायींचे आहार निर्धारित करतात. सध्या फार्ममध्ये एकावेळी 54 लिटर दूध देण्यार्‍या गायी आहेत. दूधात यूरोपियन स्टँडर्डनुसार 7 ते 9 हजार लॅक्टेशन आहे. मात्र, कॅनेडियन लॅक्टेशन 9 ते 11 हजारवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

नव्या ग्राहकांसाठी शिफारस आवश्यक...
प्राइड ऑफ काऊचे ग्राहक होण्यासाठी जुन्या ग्राहकांची शिफारस आवश्यक असते, असे सूत्रांनी सांगितले.

भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मचा आता पर्यटन टूरमध्ये समावेश झाला आहे. काही टूर ऑपरेटर मुंबई आणि पुण्याहून फार्मसाठी पॅकेज टूर आयोजित करतात. प्रत्येक वर्षी 7-8 हजार पर्यटक फार्म पाहाण्यासाठी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, देवेंद्र शहा आणि त्यांच्या हायटेक डेअरीचे फोटो...