आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Priyamvada Birla Had Gave Her 5000 Cr Property By Will To A Chartered Accountant

बिर्ला फॅमिलीतील या लेडीने एका CAच्या नावावर केली होती 5000 कोटींची प्रॉपर्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कायम चर्चेत राहणे, हे बिर्ला फॅमिलीसाठी नवे नाही. पण, जवळपास 12 वर्षांपूर्वी ही फॅमिली एका रंजक कारणामुळे चर्चेत आली होती. 2004 मध्ये अब्जाधीश कुमारमंगलम् बिर्ला यांच्या काकू प्रियंवदा बिर्ला यांचे‍ निधन झाले होते. मृत्यू आधी प्रियंवदा यांनी आपली 5 हजार कोटींची प्रॉपर्टी आपल्या सीएच्या नावावर केली होती. या कारणामुळे बिर्ला फॅमिली प्रचंड हादरली होती. या प्रकरणी जवळपास 110 खटले दाखल करण्‍यात आले होते. त्यापैकी काही अजून खटले सुरु आहेत. देशातील कॉर्पोरेटच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण असावे.

भारतातील कॉर्पोरेटच्या इतिहासातील पहिले प्रकरण...
देशाच्या कॉर्पोरेटच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण आहे की, एका बिझनेस फॅमिलीतील एखाद्या व्यक्तीने फॅमिली बाहेरील व्यक्तीच्या नावावर कोट्यवधीची प्रॉपर्टी केली होती. ही एक दुर्मिळ घटना होती. तिच्यामुळे कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली होती. प्रियंवदा बिर्ला यांच्या असे केल्याने अनेक सवाल उपस्‍थितही झाले. मीडियात तर या घटनेचे अनेक कंगोरे देशासमोर आणले.

पुढील स्लाइडवर वाचा कोण होत्या प्रियंवदा बिर्ला?
बातम्या आणखी आहेत...