आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडाची मालमत्ता विक्रमी 20.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- म्युच्युअलफंडातील व्यवस्थापनाअंतर्गत निधी (असेट अंडर मॅनेजमेंट - एयूएम) ऑगस्ट अखेरपर्यंत २०.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आहे. एयूएम गुंतवणूकदारांच्या वतीने गुंतवणूक केलेली रक्कम असते, ज्याचे व्यवस्थापन म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वतीने करण्यात येते. यात किरकोळ गुंतवणूकदारांची ४८ टक्के, तर मोठ्या गुंतवणूकदारांची ५२ टक्के भागीदारी आहे. 

डिसेंबर २०१६ च्या अखेरीस एयूएम १६,४६,३३७ कोटी रुपये होता. या दृष्टीने २०१७ च्या आठ महिन्यांत यात ४,१२,९५२ कोटींची वाढ झाली आहे. तुलनात्मक दृष्ट्या पाहिल्यास २०१६ मध्ये जानेवारी ते डिसेंबरदरम्यान गुंतवणूक ३,७१,५०२ कोटी वाढली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये यात ५,२१,७८५ कोटी रुपयांची वाढ झाली होती. 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार नोटाबंदीनंतर सोने आणि रिअल इस्टेटच्या ऐवजी लोक फंडात जास्त पैसे लावत आहेत. म्युच्युअल फंडांची संघटना एम्फीच्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये दर महिन्याला सरासरी ८.२३ लाख एसआयपी खाती उघडण्यात आली. प्रत्येक खात्यात सरासरी ३,२५० रुपये आहेत. गेल्या महिन्यात म्युच्युअल फंडात एकूण ५.९४ कोटी खाती होती, त्यातील १.५२ कोटी एसआयपी खाती होती. या माध्यमातून जुलै महिन्यात ४,९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. 
बातम्या आणखी आहेत...