आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोप्रायटरी फर्मला ३० सप्टेंबरपर्यंत भरावा लागेल प्राप्तिकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारच्या वतीने कंपन्या, व्यावसायिक प्रतिष्ठान यांच्यासह वैयक्तिक आयकर भरणार्‍या (प्रोप्रायटरी फर्म) साठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. सर्व मुद्द्यांवर विचार करून सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी, व्यावसायिक प्रतिष्ठान यांच्या सोबतच वैयक्तिक व्यापारी आणि प्रोफेशनमध्ये असणार्‍यांसाठी वर्ष २०१५-१६ चा आयकर भरण्यासाठी अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१५ करण्यात आल्याचे अर्थमंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

विविध संघटना आणि नागरिकांच्या वतीने आयकर भरण्यासाठी देण्यात आलेली तारीख वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. उपरोक्त वर्गासाठी गेल्या २९ जुलै राेजी आयकर भरण्यासाठीचा अर्ज ३, ४, ५, ६ आणि सात देण्यात आले होते. हे सर्व ई-अर्ज असून आयकर विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय व्यवहार तसेच देशांतर्गत विशेष व्यवहार करणारे करदाता ३० सप्टेंबरपर्यंत रिटर्न भरू शकतील. तसेच आता ३० सप्टेंबरनंतर याच्या तारखेत कोणत्याच प्रकारची वाढ करण्यात येणार नसल्याचेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.