आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंगणवाडी सेविकांना ‘पीएफ’ : अर्थमंत्र्यांचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील जवळपास ५० लाख अंगणवाडी व अाशा प्रकल्प सेविका – सेवक यांना प्रॉव्हिडंट फंड योजनेचा लाभ व अाराेेग्य सेवा देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असून पुढच्या आठवड्यात या निर्णयाची घाेेषणा हाेण्याची दाट शक्यता अाहे.

भारतीय मजदूर संघ व सेंट्रल ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत मंगळवारी बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगणवाडी - आशा प्रकल्प अाणि मध्यान्ह भोजन योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ व आरोग्य सेवेचा लाभ देण्याची मागणी बैठकीत करण्यात अाली. गेल्या अनेक वर्षांची असलेली ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून अरुण जेटली यांनी यासंदर्भात २२ आॅगस्ट २०१६ पर्यंत अादेश काढले जाईल, असे आश्वासन दिले अाहे.

भारतीय मजदूर संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत अंगणवाडी सेविका म्हणून २४ लाख ५८ हजार महिला तर आशा प्रकल्पात १० लाख महिला कार्यरत अाहेत. मध्यान्ह भोजन योजनेत जवळपास १५ लाख कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीद्वारे प्रॉव्हिडंट फंड व एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जाणार अाहे. याशिवाय आॅटोरिक्षा चालक, टॅक्सीचालक यासारख्या असंघटित क्षेत्रातील व्यक्ती १०० रुपये भरून ईएसआयसीचे सदस्य बनू शकतील.
बातम्या आणखी आहेत...