आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त धान्य दुकानांत व्हावी डाळींची विक्री; कडधान्य आणि धान्य संघाची शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वस्त धान्य दुकानांच्या (पीडीएस) माध्यमातून डाळींची विक्री करावी, अशी शिफारस भारतीय कडधान्य आणि धान्य संघाने (इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन- आयपीजीए) सरकारला केली आहे.  यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल, असे मत आयपीजीएने मांडले आहे. त्याचबरोबर देशात पोषण आजारांसंबंधी सुरक्षिततादेखील निश्चित होईल. याविषयी संघटनेने ग्राहक व्यवहार मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे. असे केल्यास कृषी क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय खाद्यान्न सुरक्षा कायद्याअंतर्गत केंद्र सरकार ८० कोटींपेक्षा जास्त लोकांना दोन ते तिन रुपये प्रति किलो सवलतीच्या दरात दर महिन्याला गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देते. यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी १.४ लाख कोटी रुपयांचा भार पडतो.  
 
अशी प्रणाली तयार झाल्यास ती  शेतकऱ्यांसाठी इन्सेंटिव्हप्रमाणे काम करेल आणि सरकारी खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य मूल्य मिळणे निश्चित होईल, असे मत आयजीपीएने आपल्या या शिफारशीला दुजोरा देत मांडले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगले झाले तर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्ता असलेली बियाणे यांचा वापर करतील. पीडीएसअंतर्गत डाळींचा पुरवठा सुरू झाल्यास कमी उत्पन्न गटातील लोकदेखील डाळींची खरेदी करू शकतील. त्यामुळे देशात पोषण सुरक्षादेखील चांगली होण्यास मदत मिळेल.  
बातम्या आणखी आहेत...