आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R. Jagnnath About Weekly Economic Review In Marathi

वीकली इकॉनॉमी Review: भांडवलशाहीसाठी हवा कामगारांचा मुक्त प्रवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भांडवलशाही आणि बाजारावर आधारित अर्थव्यवस्था वर्ष २००८ नंतर अयशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. अमेरिका, जपान एवढेच नाही तर चीनमध्येदेखील व्याजदर शून्यच्या जवळ ठेवून तसेच मोठ्या प्रमाणात चलनाची छपाई करूनदेखील या देशांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळालेली नाही. वास्तविक येथील परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता असल्याचे मत दोन तज्ज्ञ मॉर्गन स्टॅनलीचे रुचिर शर्मा आणि जागतिक गुंतवणूकदार मार्क फेबर यांनी व्यक्त केले आहे. जागतिक मंदी आता जास्त दूर नसली तरी तशी स्थिती आपल्याला २०१६ मध्येच पाहायला मिळेल की नाही, हे सध्या तरी सांगता येत नसल्याचे मत रुचिर शर्मा यांनी व्यक्त केले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत तेथील कर्जाचा आकडा दुपटीने वाढत आहे. अशा स्थितीत जागतिक मंदीवर "मेड इन चायना'चे लेबल लागण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसल्यामुळे नुकतेच अमेरिकेत व्याजदर वाढवण्यात आले असले तरी अमेरिका पुन्हा आर्थिक मंदीच्या दारात उभी असल्याचे मत मार्क फेबर यांनी व्यक्त केले आहे. २०१६ मध्ये अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यताही फेबर यांनी व्यक्त केली असून यासाठी ते अमेरिकेच्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. अमेरिका, जपान, युरोप आणि चीन या ज्या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, त्या एक तर मंदीचा सामना करत आहेत किंवा अर्थव्यवस्था सुस्त आहे किंवा मंदीकडे वाटचाल करत असल्याची एकंदरीत परिस्थिती दिसून येत आहे. अमेरिकेत लीमन ब्रदर्सच्या घसरणीनंतर जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. त्यानंतर साडेसात वर्षांनंतरही आपण सर्व संकटात आहोत.
भांडवलशाहीदेखील साम्यवादाप्रमाणे संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे का ?
आज भांडवलशाही संकटात का आहे, त्याची अनेक कारणे आहेत : पहिले, अमेरिकेत घाेटाळे-धोकेबाजीवर अंकुश लावणारे नियम कायमच अयशस्वी ठरत अाहेत. वर्ष २००० ते ०१ मध्ये डॉट कॉमचा फुगा फुटल्यापासून अमेरिकेच्या सब-प्राइममधील संकटापर्यंत असेच होत राहिले आहे. दुसरे, युरोपमध्ये कॉमन चलन स्वीकारले तरीही समान आर्थिक नीती विकसित करण्यात यश मिळाले नसल्यामुळे ग्रीसला अनेक वेळा कर्ज घ्यावे लागले. जोपर्यंत या अंत न होणाऱ्या प्रक्रियेवर अंकुश लावण्याचा प्रयत्न सुरू झाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिसरे युरोपमध्ये व्यापार आणि नागरिकांच्या जाण्या-येण्यावर लावलेले कृत्रिम राष्ट्रीय बंधनेे हे हाेय.
जोपर्यंत बाजारातील शक्तींना मोठ्या व्यावसायिक देशांशी मुक्त व्यापाराचे स्वातंत्र्य देण्यात येत नाही तोपर्यंत भांडवलशाही यशस्वी होऊच शकत नाही. राष्ट्रीय विचारधारा आणि सांस्कृतिक कारणांमुळे देशांमध्ये याविषयी अडचणी उभ्या केल्या आहेत. सर्व देशांना आपापल्या उद्योगांचे संरक्षण करायचे आहे. स्पर्धेमध्ये टिकले नाही तर उद्योग बेकार होऊन सरकारसाठी ओझे बनतात. त्यामुळे विकासाची गती मंदावते. संस्कृती आणि विदेशीची भीती आता भांडवलवादाला थांबवण्याचे मुख्य कारण बनले आहे. कारण सर्व देश लोकांच्या खुल्या येण्या-जाण्याने चिंतित आहेत. प्राथमिक अर्थशास्त्र आपल्याला सांगते की, उत्पादनाचे तीन कारक असतात - पैसा, कष्ट आणि जमीन. संघटन आणि टेक्नॉलॉजी या वेगळ्या गोष्टी आहेत. येथे लक्ष देण्याची बाब ही आहे की, या तीन कारकांपैकी भांडवली देशांमध्ये मुक्त स्वरूपात ये-जा सुरू असून यामध्ये श्रमाचा समावेश नाही. उदाहरण सांगायचे झाल्यास अमेरिकेने भारतीय आयटी व्यावसायिकांच्या एन १ बी व्हिसा घेण्यापासून बंधने घालण्यास सुरुवात केली असून त्यांनी अशा व्हिसावर लावण्यात येणारे शुल्क दुपटीने वाढवलेे आहे. या नियमाचे पालन केल्यामुळे भारतीय कंपन्यांवर दरवर्षी ४० कोटी डॉलरचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. युरोपियन युनियनने आपल्या सीमेअंतर्गत लोकांना मुक्त प्रवासाला मंजुरी िदली आहे. मात्र, बाहेरून आलेल्या लोकांसाठी त्यांचे धोरण उदार नाही. याचप्रमाणे चीन आणि जपानदेखील सर्वांना इमिग्रेशनची मंजुरी देत नाही. फक्त आखाती देशांमध्ये असे नाही. येथे विदेशी कामगारांना येण्या-जाण्याची सहज परवानगी मिळते. येथील देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात खूप पैसे कमावले आहेत. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा कमी होत आहेत. त्यामुळे आता हे देश विदेशी कामगारांच्या उत्पन्नावर बंदी आणतील आणि काही कामगारांना पुन्हा स्वदेशी पाठवण्याचीही शक्यता आहे. भांडवलशाहीच्या अस्तित्वासाठी कामगार आणि कौशल्य यांना येण्याजाण्याची मोकळीक असणे आवश्यक आहे. जोपर्यंत जगभरातील देश अशा लोकांच्या येण्याजाण्यावर बंधने घालतील ताेपर्यंत भांडवलवादाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. चीनचेच उदाहरण घ्या, अनेक दशकांपासून त्यांनी "एकच मूल' हे धाेरण अवलंबले आहे. त्यामुळे त्यांना आता लवकरच कामगारांची उणीव भासणार आहे. यावर विदेशातील नागरिकांसाठी दरवाजे खुले करून तेथील युवक कामगारांना येण्याची परवानगी देणे हा एकच उपाय आहे. मात्र, सांस्कृतिक कारक त्यांना असे करण्यापासून अडवेल. याप्रमाणे भांडवलवादाचे अस्तित्व व्याजदरात कपात करून, अर्थसंकल्पाचे संतुलन मिळवण्यावर कमी निर्भर आहे. उत्पादनाच्या संबंधित कारकांमुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यास असलेल्या स्वातंत्र्यावर जास्त अवलंबून आहे. मात्र, त्यांच्या येण्याजाण्यावर योग्य नियंत्रणही पाहिजे. जेव्हा श्रमाला मुक्त करण्यात येईल तेव्हाच भांडवलवाद यशस्वी होईल.

rjagannathan@dbcorp.in
(लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.)