आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर सरकार साेने ठेवू शकते तर सर्वसामान्य जनता का नाही?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँकेने मागच्या महिन्यामध्ये घरात तसेच मंदिरांमध्ये पडून असलेले साेने प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी साेने तारण याेजनेची घाेषणा केली. या याेजनेत साेने ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावर व्याज मिळेल. आपण दागिने, नाणी वा लगडी जे द्याल त्यातील साेन्याच्या प्रमाणाची तपासणी केली जाईल. त्यानंतर ते वितळवले जाईल आणि काही वर्षांनी व्याजासकट ते तुम्हाला परत मिळेल. व्याज हे साेन्यातच मिळेल, रुपयात नाही. व्याजाचे प्रमाण एक ते दाेन टक्के असेल आणि ते कदाचित करमुक्त असेल.

बाकी अन्य याेजनांप्रमाणे ही योजनादेखील फाेल ठरू शकते. एक गाेष्ट समजत नाही की, आपण आपले साेने त्यांच्याकडे ठेवावे यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक सातत्याने प्रयत्न का करत आहे? अर्थात, याची काही आर्थिक कारणे आहेत. आपल्याला दरवर्षी माेठ्या प्रमाणावर साेने आयात करावे लागते आणि त्याची भरपाई डाॅलरमध्ये करावी लागते.

असे वाटते की, लाेक साेने का खरेदी करतात? हा मुद्दा सरकार समजावून घेत नाहीये. कारण जाेपर्यंत सरकारला ही गाेष्ट समजणार नाही ताेपर्यंत काेणतीही साेने ठेव याेजना सफल हाेणार नाही. लाेक वाईट िदवस िकंवा अडीअडचणीच्या काळाचा िवचार करून साेने खरेदी करतात आणि प्रसंगी ते तारण ठेवून त्यावर पैसे घेतात. मुलीच्या लग्नासाठी दागिने बनवतात. भविष्यासाठी नाणी आणि लगडीदेखील खरेदी करतात. पण ही खरेदी करताना साेन्यावर कर द्यावा लागेल याचा काेणी विचार करत नाही. तुमच्याकडे िकती साेने आहे हे जाहीर करता त्या वेळी तुम्हाला कर द्यावा लागताे. पण आपल्याकडे िकती साेने आहे हे काेणी सांगत नाही हेदेखील तितकेच खरे आहे.

साेने बचतीचे एक साधन आहे. व्याज कमी असाे वा जास्त, सर्वसाधारण माणूस पैसे वाचवताेच. व्याज जास्त असेल तर ताे जास्त वाचवेल, कमी असेल तर कमी वाचवेल. पण पैसे वाचवणार हे नक्की. बँका येण्याच्या आधीही लाेक बचत करत हाेते. जाे सक्षम आहे तो दीर्घ कालावधीतील बचतीसाठी साेने खरेदी करेल. महागाईच्या विराेधात साेन्याला आपली किंमत कायम ठेवण्यात यश आले आहे. प्रत्येक भारतीयाला याची माहिती आहे.

साेने हा केवळ एक धातूचा तुकडा नाही, तर पैसादेखील आहे ही गाेष्ट रिझर्व्ह बँकेने समजून घेतली पाहिजे. साेने देऊन पैसा किंवा काेणतीही वस्तू घेतली जाऊ शकते. साेन्याच्या बदल्यात ज्या वस्तूची देवाणघेवाण हाेणार ताेही एक पैसाच आहे. साेन्याला कायम िकंमत राहणार. महागाईमुळे कागदी रुपयाची िकंमत कमी हाेऊ शकते. हे गरीब माणसाला माहिती आहे.

आणखी एक कारण आहे ते म्हणजे साेने ही गरिबांची स्विस बँक आहे. जेव्हा तुम्ही स्विस बँकेत पैसे ठेवता त्या वेळी परताव्याचा विचार करत नाहीत. आपल्या बचतीची रक्कम सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्यावर अधिकार्‍यांची नजर पडायला नकाे. सरकार साेन्याचा वापर आणि साठा याला थाेपवू शकत नाही. त्यामुळे सर्वसाधारण लाेकांचा साेन्यावर विश्वास आहे. वास्तविक सरकारवर काेणत्याही भारतीयाचा विश्वास नाही. साेने हादेखील याच अविश्वासाचा परिणाम आहे.

सोन्याचा उपयाेगदेखील आहे. बहुतांश भारतीय साेन्यापासून दागिने तयार करणे पसंत करतात. त्यामुळे साेन्याच्या किमतीतील चढ-उतारामुळे त्यांना चिंता वाटत नाही. किंमत कमी झाल्यावर ते आणखी साेने खरेदी करतात. किमती वाढल्यावर कमी खरेदी हाेते. अडीअडचणीच्या काळात ते साेने विकतात. सल्ले देण्याएेवजी लाेकांनी सांगितल्याप्रमाणे जर कामे केली तरच ते सरकारवर विश्वास ठेवतात. जर साेने उत्पादन ही मालमत्ता नाही तर मग रिझर्व्ह बँक सव्वा लाख काेटी रुपयांचे साेने आपल्याकडे का ठेवून आहे? जर तुम्ही साेने साठवले आहे तर मग दुसर्‍यांना साेन्याचा साठा करू नका, असा सल्ला का दिला जाताे? ज्या कारणासाठी रिझर्व्ह बँक साेने खरेदी करते त्याच कारणासाठी सर्वसामान्य जनता साेने खरेदी करते. अडीअडचणीच्या काळात उपयाेगी येण्यासाठी. कागदी चलन साेन्यामुळेच आले आहे, साेन्यामुळे हे चलन आलेले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. साेन्याच्या बदल्यात बँका जी पावती देतात तेच चलन बनले. त्यानंतर याच कागदी पैशांनी चलनाच्या रूपाने साेन्याची जागा घेतली. भारतीय साेने खरेदी करतात. कारण, त्यांना माहिती आहे की हाच खरा पैसा आहे. पण सरकार हे का समजून घेत नाही.

जनतेला त्यांच्याजवळ साेने बाळगायला देणे हे अर्थमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासाठी चांगले ठरेल. कागदी रुपया चलनाचे मूल्य स्थिर कसे राहील यादृष्टीने काम केले पाहिजे. रुपयाचे मूल्य कमी हाेणार नाही असा विश्वास लाेकांमध्ये निर्माण झाला तर त्यांचा कल आपाेआपच साेने खरेदीकडून रुपयाकडे झुकेल. रुपयाचे मूल्य आकर्षक राहणे हाच साेन्याचे आकर्षण कमी करण्याचा एकमेव उपाय आहे. जर साेने तारण याेजना यशस्वी झाली तर मला आश्चर्य वाटेल.

आर. जगन्नाथन
rjagannathan@dbcorp.in
लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.
बातम्या आणखी आहेत...