आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बीत हंगामातील गव्हाची पेरणी तब्‍बल २७ टक्क्यांनी घटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रब्बी हंगामातील ऑक्टोबरपासून सुरू झालेली गव्हाची पेरणी आतापर्यंत ११७.३२ लाख हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या १६१.५७ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत हा आकडा २७ टक्के कमी आहे. यामुळेच जमिनीतील ओलावा कमी आणि मान्सूनच्या पावसातील घटीमुळे खरीफ हंगामातील पेरणी उशिरा होणार आहे.

राज्याच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर अाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. २७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत एकूण ३१७.९६ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बीची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३७२.६१ लाख हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली होती. दरम्यान, गेल्या वर्षी आतापर्यंत याच कालावधीत झालेल्या गव्हाच्या पेरणीपेक्षा या वर्षी झालेली गव्हाची पेरणी कमी असल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केले आहे. गव्हाच्या पेरणी क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रातच आतापर्यंत पेरणी झाली अाहे. पंजाब, हरियाणासारख्या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये लवकरच गव्हाची पेरणी सुरू होईल. मान्सूनमध्ये कमी पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळेच आतापर्यंत गहू पेरणीत जोर नसल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले, तर खरिपाच्या पिकांची पेरणी उशिरा झाल्यामुळे शेतकरी शेतांना साफ करण्यात व्यग्र आहेत. गव्हाची पेरणी सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान पूर्ण होते.
गव्हाचे उत्पादन कमी
वर्ष २०१४-१५ (जुलै ते जून) दरम्यान गव्हाचे उत्पादन घटून ८८९.४ लाख टन होण्याचा अंदाज आहे. याआधीच्या वर्षात ९५८.५ लाख टन सर्वाधिक गव्हाचे उत्पादन झाले होते.