आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी राजन यांचा निर्णय घातक, अर्थतज्ज्ञांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देश - विदेशातील अर्थतज्ज्ञ व उद्योगपतींनी रघुराम राजन यांना आरबीआयचे गव्हर्नर म्हणून फेरनियुक्ती न देण्याच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे. राजन यांना मुदतवाढ न मिळणे भारतीय अर्थव्यवस्थेच्या हिताचे नाही. त्यामुळे जगभरात महागाई व बँकांच्या फसलेल्या कर्जाबाबतच्या (एनपीए) धोरणांना सरकारचे समर्थन मिळत नसल्याचा संदेश जाऊ शकतो. राजन यांच्या पदावरून जाण्यामुळे संपूर्ण देशाचे नुकसान होईल. अर्थव्यवस्थेला तर ते खूपच महागात पडू शकते, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरबीआय गव्हर्नर म्हणून पुन्हा काम करण्याची आपली इच्छा नसल्याने राजन यांनी शनिवारी जाहीर केले होते. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ ४ सप्टेंबर रोजी संपणा आहे. त्यानंतर राजन यांनी त्यांच्या प्रोफेसर पेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिकागो विद्यापीठातील राजन यांचे सहकारी लुईगी जिंगेल्स यांनी टि्वट केले आहे की, राजन आरबीआय सोडून बूथला परतणे आमच्यासाठी चांगले आहे. परंतु ते भारतासाठी नुकसानीचे ठरेल.

इंग्लंडमधील लेबर पार्टीचे नेता व भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई, जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ व माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू, नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, इन्फोसिसचे मानद अध्यक्ष एनआर नारायणमूर्ती, माजी अर्थसचिव अरविंद मायाराम, हाॅर्वर्ड विद्यापीठातील प्रो. गीता गोपीनाथ यांनीही राजन यांना फेरनियुक्ती न देण्याच्या निर्णयाबाबत निराशा व्यक्त करताना अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. औद्योगिक संघटना असोचेमनेही सरकार दुसऱ्या कार्यकाळासाठी राजन यांचे मन वळवेल असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यांचे नसणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत नाही, असेही असोचेमने म्हटले आहे.

मल्ल्याही गव्हर्नर बनू शकतात : काँग्रेस
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी हे सरकार विजय मल्ल्यांनाही गव्हर्नर बनवू शकते, असे मजेदार टि्वट केले आहे. गजेंद्र चौहान ते चेतन चौहान अशी सरकारची पसंती पाहिली तर मद्यसम्राट विजय मल्ल्याही गव्हर्नर म्हणून िनयुक्त होऊ शकतात.कारण त्यांनाही बँकिंग व्यवस्थेची चांगली समज आहे.
बातम्या आणखी आहेत...