आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण कोरियात आयफोन-X च्या विक्रीआधी अॅपल कंपनीच्या मुख्यालयावर टाकले छापे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोल- अॅपलचा नवा फोन आयफोन-X ची विक्री सुरू होण्याआधी दक्षिण कोरियामधील कंपनीच्या मुख्यालयावर छापे टाकण्यात आले.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरियाच्या “फेअर ट्रेड कमिशन’ (पारदर्शी व्यापार आयोग) च्या अधिकाऱ्यांनी बिझनेस प्रॅक्टिससंबंधी चौकशी केली. आय फोनच्या विक्रीवर परिणाम व्हावा या उद्देशानेच हा छापा टाकण्यात अाला असल्याचा आरोप पश्चिमी मीडियाने केला आहे. दक्षिण कोरियामध्ये शुक्रवारपासून आयफोन-X ची विक्री सुरू झाली आहे.  


दक्षिण कोरियातील डीलरसोबत झालेल्या करारात काही अनुचित तर नाही ना, यासंबंधीची अॅपलच्या विरोधात चौकशी गेल्या वर्षीपासून सुरू झाली होती. हा नवा छापा त्याच चौकशीचा एक भाग असल्याचे काही सूत्रांनी सांगितले आहे. अॅपलचे उत्पादन दक्षिण कोरियामध्ये खूपच लोकप्रिय आहे. २०१५ मध्ये येथे “आयफोन - ६’ची विक्री सुरू होताच बाजारातील अॅपलची भागीदारी विक्रमी ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.  


विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेपासून स्थानिक कंपन्यांचा बचाव करण्यासाठी कोरिया फेअर ट्रेड कमिशन पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप या आधीदेखील अनेक वेळा लावण्यात आला होता. सॅमसंग आणि एलजी या येथील स्मार्टफोन बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. सॅमसंग तर दक्षिण कोरियातील सर्वात मोठी कंपनी आहे. सॅमसंगने सध्या येथे “अपग्रेड टू गॅलक्सी’ नावाची एक योजना सुरू केली आहे. या योजनेत आयफोन युजरला महिन्याभरासाठी ट्रायलवर गॅलक्सी नोट-८ किंवा गॅलक्सी एस-८ दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...