आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय रेल्वेत आता राहाणार नाही कुली; \'सहाय्यक\'ला मिळणार नवा ड्रेस कोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लाल गणवेश, दंडावर बांधलेला बिल्ला व सामान वाहणारे कुली तुम्ही रेल्वे स्टेशनवर पाहिले असतील. यापुढे ते तुम्हाला दिसणार नाहीत. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी कुलींना नवी ओळख दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यांना नवा ड्रेसकोड दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रभु यांनी संसदेत सांगितले, की देशातील कुलींना सन्मान मिळायला हवा. ते जे काम करत आहे, ते कनिष्ठ दर्जाचे आहे, असे त्यांनी समजू नये. प्रभु यांनी कुलीला 'सहाय्यक' अशी नवी ओळख दिली आहे. एअरपोर्टच्या धर्तीवर सहाय्यक आता स्टेशनवरही दिसतील. ट्रॉलीतून ते प्रवाशांचा सामान वाहून नेण्याचे काम करतील.
सहाय्यकांना नवा ड्रेसकोड दिला जाणार आहे. निळ्या रंगाचा त्यांचा गणवेश असेल. नवा गणवेश त्यांना लवकरच दिला जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. बिल्लासोबत नेमप्लेटही देण्यात येणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, भारतीय रेल्वेमध्ये केव्हापासून चालत आली आहे कुलीची परंपरा...