आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Ministry Introduced New Checks On Booking Of E And I Tickets

ई-तिकिटांचा काळा बाजार बंद होणार, एका युजरला बुक करता येतील फक्त सहा तिकीटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयआरसीटीसी ई-तिकिटांमधील काळा बाजार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नवी उपाययोजना शोधून काढली आहे. ती म्हणजे, आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता एका यूजर आयडीवरून महिन्याभरात केवळ सहा तिकिटे बुक करता येणार आहे.

कधीपासून लागू होईल नवा नियम....
- नवा नियम 15 फेब्रुवारी 2016 पासून लागू करण्‍यात येणार आहे. रेल्वेतील दलालांवर अंकूश ठेवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हे ठोस पाऊल उचलले आहे.
- सध्या एका युजरला महिनाभरात 10 तिकिटे बुक करता येतात. यात कपात करण्यात आली असून एक युजर आता केवळ सहा तिकिटे बुक करू शकतो.

काय म्हणणे आहे रेल्वे मंत्रालयाचे...?
- एका प्रसिद्धी पत्रकात रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात सध्या 90 टक्के लोक एक आयडीवरून महिनाभरात जास्तीत जास्त तिकिटे बुक करत आहे.
- या सर्वेक्षणानुसार, रेल्वेने एक युजर आयडीसाठी सहा तिकिटांची मर्यादा घातली आहे. एका युजरला महिनाभरात आता केवळ सहा तिकिटे बुक करता येणार आहे.

नवा नियम काय?
- सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान एका आयडीवरून केवळ दोन तिकिटे बुक करता येतील.
- तत्काळ बुकिंगसाठी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान एका आयडीवरून दोन तिकिटे बुक करता येतील.
- अशा पद्धतीने आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून एका महिन्यात एका युजर आयडीवरून केवळ सहा तिकिटे बुक करता येतील.
- क्विक बुक ऑप्शन सकाळी 8 ते दुपारी 12 या कालावधीत काम करणार नाही.
- सर्व तिकिट एजेंट्‍सला (YTSK, RTSA, IRCTC) तिकिट बुकिंगच्या सुरुवातीच्या अर्धा तास बुकींग करता येणार नाही.
- ई-वॉलेट व कॅश कार्ड्सच्या माध्यमातूनही सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेदरम्यान तिकीट बुक करता येणार नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, सीनियर सिटीजनला दाखवावे लागेल आय कार्ड