आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: दागिने नव्हे, या आहेत रत्नजडीत लाखों रुपये किमतीच्या राख्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रक्षाबंधन' हा भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण. बहीण राखी रूपी रेशम धागा भावाच्या मनगटावर बांधून या नात्याला अजून घट्ट करत असते. भावाच्या दिर्घायुष्यासाठी बहीण परमेश्वराकडे प्रार्थना करत असते.

अलिकडच्या काळात रक्षाबंधन सणाला हायटेक स्वरुप प्राप्त झाले आहे. इंटरनेटच्या युगात रेशमी धाग्याची जागा आता व्हर्च्युअल राखीने घेतली असतानाही बाजारात रत्नजडीत राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहे. या राख्यांची किंमत 10 लाखांच्या घरात आहेत. विशेष म्हणजे इतक्या महागड्या राख्या खरेदी करण्यास ग्राहक उत्सूक असल्याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजस्थानातील श्रीगंगानगरच्या बाजारात महागड्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे सोने, चांदीसह रत्नजडीत राख्या खरेदी करण्‍यासाठी ग्राहक उत्सूक असल्याचे दिसत आहेत.

श्रीगंगानगरचे सोन्याचे व्यापारी सुनील राणा यांनी सांगितले की, त्यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये 999 रुपयांपासून 10 लाख रुपये किमतीच्या राख्या आहेत. खास रक्षाबंधन सणासाठी राख्यांची बांधणी करण्‍यात आली आहे. सोने-चांदीसह हिर्‍याचा वापर करून राख्यांवर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, रत्नजडीत राख्या आणि त्यांच्या किमती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...