आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अब्जावधीची संपत्तीचा मालक आहे हा व्यक्ती, तरीही चालवतो हेअर सलून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरूमध्ये राहाणारे अब्जाधिश रमेश बाबू चालवतात त्यांचे सलून

रतन टाटा, मुकेश अंबानी, मार्क जुकरबर्ग यांसारख्या बड्या उद्योगपतींची नावे आज कोण नाही ओळखत. मात्र या नावांसोबतच अशा अनेक उद्योगपतींची नावे आहेत ज्यांना फार कमी लोक ओळखतात. हे ते लोक आहेत, जे त्यांच्या कष्टाने आणि चिकाटीमुळे यशाच्या या शिखरावर पोहोचले आहेत. बंगळूरूचे रमेश बाबू यांपैकीच एक नाव आहे. एकेकाळी रमेश बाबू न्हावी होते, मात्र त्यांच्या दूरदृष्टी, कष्ट आणि जिद्दीमुळे ते आज अब्जावधीचे मालक आहेत. त्यांच्याजवळ रॉल्स रॉयस, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू आणि ऑडी यांसारख्या लक्झरी कारचा ताफा आहे.

रमेश बाबू
43 वर्षांचे रमेश बाबू हे बंगळुरूच्या अनंतपूरातील रहिवाशी आहेत. त्यांच्या वयाच्या 7 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडील बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडिअमजवळ हेअर सलूनचे दुकान चालवत होते. वडील्यांच्या मृत्यूनंतर रमेश बाबूच्या आईने मुलांचे पोट भरण्यासाठी लोकांच्या घरी जेवण बनवण्याचे काम सुरू केले. तसेच त्यांच्या पतीचे दुकान महिना ५ रुपये भाड्याने दिले.

ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली
रमेश बाबूंनी अनेक संकटांवर मात देत आपले शिक्षण चालू ठेवले. 12 वी परिक्षेत अपयश आल्यानंतर त्यांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूटमधून इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा केला. 1989 मध्ये रमेश बाबूंनी वडिलांची दूकान चालवण्यास सुरूवात केली. या दुकाना मॉडर्न करून त्यांनी खुप पैसे कमावले आणि एक मारूती व्हॅन विकत घेतली. मात्र ते स्वतः कार चालवू शकत नव्हते म्हणून त्यांनी ती कार भाड्याने देण्यास सुरू केले. 2004 मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी रमेश टूर्स अँड्र ट्रॅवल्सची सुरूवात केली.

पुढील स्लाईडवर वाचा, रमेश बाबू यांच्याकडे आहे 256 कार्सचा ताफा, अमिताभ ते ऐश्वर्यापर्यंत ग्राहकांच्या यादीत आहेत अनेक सेलिब्रिटी