आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीश असूनही कापतो लोकांचे केस, बिग बी, शाहरुख आहेत क्लाइंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतन टाटा, मुकेश अंबानी, मार्क झुकरबर्गसारख्या बड्या हस्तींना आख्खे जग ओळखते. परंतु, जगाच्या पाठीवर अशा काही व्यक्ति आहेत की, त्यांनी स्वत:चा मेहनतीवर यशाचे उच्च शिखर गाठले आहे. बंगळुरु येथील रहिवासी रमेश बाबू हे त्यापैकी एक आहेत.

रमेश बाबू यांचे एके काळात व्हाव्याचे दुकान होते. परंतु आपली दूरदृष्टी आणि परिश्रमाच्या जोरावर ते आज अब्जाधीश बनले आहेत. रमेश बाबूंकडे आज सगळं काही आहे. रोल्स रॉयस, मर्सडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडी सारख्या 256 लक्झरी कारचा ताफा आहे. मात्र, ते आजही लोकांचे केस कापतात. रमेश बाबू यांचे स्वत:चे सलुन आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सारखे अनेक बडे क्लाइंट आहेत.

43 वर्षीय रमेश बाबू हे बंगळुरूमधील अनंतपूर येथील रहिवासी आहेत. ते सात वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ रमेश बाबू यांच्या वडिलांचे छोटेसे सलुन होते. वडिलांच्या मृत्युनंतर रमेश बाबू यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु रमेश बाबू यांची आई थोडीही डगमगली नाही. या माऊलीने सलुन पाच रुपये महिन्याने भाड्याने देऊन स्वत: लोकांच्या घरी धुनीभांडी केली.
सुरु केली 'टूर अॅण्ड ट्रॅव्हल' कंपनी
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रमेश बाबू यांनी शिक्षण घेतले. 12वीत नापास झाल्यानंतर रमेश बाबू यांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला. 1989 मध्ये वडीलांचे सलुन परत मिळवले. सलुनला मॉडर्न लुक देऊन स्वत: काम केले. जंगम पैसा कमावला. त्यातून रमेश बाबू यांनी एक मारुती व्हॅन खरेदी केली. परंतु, रमेश बाबू यांना कार चालवता येत नसल्याने ती भाड्याने देण्यास सुरवात केली. सन 2004 मध्ये रमेश बाबू यांनी स्वत:ची 'रमेश टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स' कंपनी सुरु केली.

पुढील स्लाइडवर वाचा, रमेश बाबूकडे आहे 256 कारचा ताफा...