फोटो: डावीकडून मुकेश अंबानी, स्व. धीरूभाई अंबानी, कोकिलाबेन आणि अनिल अंबानी
राजकोट - भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये सामिल असलेले अनिल अंबानी यांचा 4 जूनला 56 वा वाढदिवस आहे. अनिल अंबानी धीरूभाई यांचे लहान चिरंजीव आहेत. तर भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अनिल यांचे नाव सामिल आहे. रिलायंस समूहाचे ते नेता आणि संस्थापक असलेल्या अनिल अंबानी यांचा जन्म 4 जून 1959 ला झाला होता. ऑक्टोबर 2007 ला त्यांच्याजवळ 42 अब्ज अमेरीकन डॉलर एवढी संपत्ती होती. यानुसार ते जगातील 6 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अनिल अंबानी सहाय्यक प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून 1983 मध्ये रिलायंसमध्ये सहभागी झाले होते. त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक वित्तीय सुधार आणण्याचे श्रेय दिले जाते.
अनिल यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी सुरू केलेला रिलायंस समुह भारतातील सर्वात मोठा व्यावसायिक घराणे आहे. अनिल यांच्या आईचे नाव कोकीलाबेन असे आहे. अनिल यांचे लग्न बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम हिच्यासोबत झाले. या दाम्पत्याला दोन मुले असून त्यांची नावे जय अनमोल तसेच जय अंशुल अशी आहेत. अनिल रिलायंस कॅपिटल, रिलायंस लिमिटेडटे चेअरमन आहेत. मुकेश अंबानीच्या मुलांप्रमाणे अनिल यांचा मोठा मुलगासुध्दा वडीलांना व्यवसायात मदत करतो. अनमोलने कंपनीच्या अनेक मोठ्या डील केल्या आहेत. तर अंशुल सध्या शिक्षण घेत आहे.
अनिल अंबानी यांना मिळालेले पुरस्कार -
- टाइम्स ऑफ इंडिया टीएनएस निवडणूकीद्वारे 2006 चा बिझनेसमन ऑफ दी इयर हा पुरस्कार अनिल यांना मिळालेला आहे.
- 2004 मध्ये प्लेट्स ग्लोबल एनर्जी अवॉर्ड्समध्ये सीईओ ऑफ दी इयर निवडले गेले.
- सप्टेंबर 2003 मध्ये ‘एमटीवी यूथ आयकॉन ऑफ द ईयर’ म्हणून अनिल यांची निवड झाली.
- बॉम्बे मॅनेजमेंट एसोसिएशनने ऑक्टोबर 2002 मध्ये ‘दशकातील उदयोन्मुख पुरस्काराने’ सन्मानित केले होते.
पुढील स्लाईडवर पाहा, अनिल अंबानी यांचे फोटो...