आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata Invests In Chinese Phone maker Xiaomi News In Marathi

रतन टाटांची "शिओमी' कंपनीत गुंतवणूक, व्यवसाय वाढीसाठी नवी संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतातील अब्जाधीश उद्योगपती तसेच टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी स्मार्टफोन बनवणारी चीनची दिग्गज कंपनी "शिओमी'मध्ये गुंतवणूक केली आहे. शिओमी इंडियाचे प्रमुख मनू जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा हे आमच्यासाठी फक्त गुंतवणूकदारच नव्हे तर मार्गदर्शक आहेत. आम्हाला त्यांच्यासारखा रणनीतिकार मिळणे कठीण आहे. भारतात व्यवसायवाढीसाठी आम्हाला टाटांची भरपूर मदत होणार आहे.

शिओमीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ली जून यांच्या मते, रतन टाटा हे जगातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिकांपैकी एक आहेत. त्यांची गुंतवणूक ही आमच्या भारतातील यशावरील शिक्कामोर्तब आहे.
शिओमीत गुंतवणूक करणारे पहिलेच भारतीय
रतनटाटा यांनी यापूर्वी अनेक परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, शिओमीत गुंतवणूक करणारे ते पहिलेच भारतीय उद्योगपती ठरले आहेत. टाटा यांनी आर्थिक सल्लागार कंपनी कॅपिटल इंडिया, कमी उत्पन्न असलेल्या लोकांना आरोग्य सेवा देणारी कंपनी स्वस्थ, स्नॅपडील, पेटीएम, अर्बन लॅडर, ब्ल्यूस्टोन आणि कार देखो या कंपन्यांत आधीच गुंतवणूक केलेली आहे. जुलै २०१४ मध्ये भारतीय बाजारात दाखल झालेल्या शिओमी कंपनीने भरारी घेतली आहे. आयडीसी या बाजार सर्वेक्षण कंपनीच्या मते, मागच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत शिओमी भारतीय बाजारातील पाचव्या क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी ठरली आहे.
नवे पाऊल