आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata Invests In India's Largest Pet's Portal DogSpot.in

डॉग स्पॉट इनमध्ये रतन टाटांची गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पेट केअर पोर्टल डॉग स्पॉट. इनमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा पशुप्रेमी आहेत. त्याच उद्देशातून त्यांनी ही गुंतवणूक केली आहे, परंतु या स्टार्टअपमध्ये त्यांनी किती पैसा लावला आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

या प्रकल्पात टाटांनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती या पोर्टलचे सहसंस्थापक सीईओ राणा अथेय यांनी िदली. या स्टार्टअप कंपनीमध्ये आंत्रप्रेन्योअर रॉनी स्क्रुवाला यांनीही पैसे गुंतवले आहेत. अन्य गुंतवणूकदारांत अशोक मित्तल, ऋषी पारती, धीरज जैन अभिजित पै यांचा समावेश आहे. राणा अथेय यांनी सांगितले की रतन टाटा यांच्या वतीने करण्यात आलेली गुंतवणूक आमच्यावरील विश्वास पाळीव प्राण्यांविषयी देशात आत्मीयता वाढत असल्याचे दर्शवणारी आहे. याआधी डॉग स्पॉट. इनने २०१२ मध्ये आलोक वाजपेयी (संस्थापक, इजीगो. कॉम), विकास सक्सेना (सीईओ िनम्बस) इतर गंुतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. २०१२ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर रतन टाटा यांनी ई- कॉमर्सपासून कॅब सर्व्हिसेसपर्यंत अनेक कंपन्यांमध्ये मोठी गंुतवणूक केली आहे. त्यांनी स्नॅपडील, अर्बन लॅडर, ब्ल्यू स्टोन, कारदेखो, श्याओमी ओला मध्ये गुंतवणूक केली आहे.