आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata Says 'If A Startup Doesn't Excite Me, I Don't Make An Investment,

युवा देशाच्या रचनात्मकतेचा ‘अवतार’ आहे "स्टार्टअप'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारी रोजी "स्टार्टअप इंडिया' अभियान सुरू करणार आहेत. यानिमित्त ४० पेक्षा जास्त बिझनेस लीडर्स आणि २००० स्टार्टअप उद्योजक उपस्थित राहतील. या आधी देशातील दोन ज्येष्ठ उद्योगपती आणि एका उद्योग संघटनेने या स्टार्टअपवर त्यांची मते व्यक्त केली.

जोश देणाऱ्या आयडियांमध्ये गुंतवणूक करतो : टाटा
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्टार्टअप्समध्ये युवा भारताच्या रचनात्मकता आणि इनोव्हेशनचा अवतार म्हटले आहे. जोश देणाऱ्या आयडियांमध्येच मी गुंतवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार्टअपचा संस्थापक कोण याचाही विचार व मूल्यांकन करतो. बुधवारी येथे कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रतन टाटा यांनी आतापर्यंत दोन डझनपेक्षा जास्त स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

यामध्ये स्नॅपडील, कारया, अर्बन लँडर, ब्लूस्टोन, कारदेखो, ओला आणि श्याओमी यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या आठवड्यातच त्यांनी डॉगस्पाॅट आणि ट्रॅक्सनमध्ये गुंतवणूक करण्याची घाेषणा केली आहे.

सर्व ग्रह-तारे उद्योजकांसाठी अनुकूल : नारायणमूर्ती
सध्याचे दशक हे उद्योजकांसाठी योग्य असल्याचे मत इन्फोसिसचे सहसंस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी व्यक्त केलेे. सध्या सर्व "ग्रह-तारे' त्यांच्यासाठी अनुकूल आहे. देशात अनेक संधी आहेत, उद्योजकांमध्ये फक्त उत्साह भरण्याची आवश्यकता आहे. आयसीएसआयच्या एका कार्यक्रमानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. इन्फोसिसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर नारायणमूर्ती यांनी "कॅटामेरान व्हेंचर्स' नावाची व्हेंचर गुंतवणूक कंपनी सुरू केली आहे.
देशात मोठ्या प्रमाणात व्हेंचर गुंतवणूक उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारदेखील प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्टार्टअप्सला सर्व करांतून सूट हवी : चंद्रशेखर
आयटी उद्योजकांची संघटना असलेल्या नॅस्कॉमने स्टार्टअप कंपन्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा सर्व करांतून सूट देण्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्प सूचना संदर्भात अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ही सूचना करण्यात आली आहे. यामुळे उद्योजक वेळ व शक्ती पूर्णपणे कल्पनेवर लावू शकतील. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही जोखमीची गुंतवणूक असते. त्यामुळे त्यांनाही करातून सूट देण्यात यावी. वर्षभरात टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये ४० टक्क्यांची वाढ झाली असल्याचे नॅस्कॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी सांगितले.