आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करात जास्त अंतर असेल तरच दर बदल : सीबीईसी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर एखाद्या वस्तू किंवा सेवेवर निश्चित करण्यात आलेल्या करात आधीच्या तुलनेत जास्त अंतर असेल तरच कर दरात बदल करण्यात येईल. सीआयआयच्या एका कार्यक्रमात बोलताना सीबीईसीच्या प्रमुख वनज सरना यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. वस्त्रोद्योगातील ट्रेडर कापडावरील ५ टक्के कर रद्द करण्याची मागणी करत अाहेत, अशा वेळी त्यांनी व्यक्त केलेल्या या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील मंगळवारी वस्त्रोद्योगावरील कर कमी होणार नसल्याचे संसदेत सांगितले होते. जीएसटीची अंमलबजावणी करण्यासाठी काही अडचणी आल्या होत्या, त्यातील काही मुद्दे स्पष्ट करण्यासाठी लवकरच दुसरे एफएक्यू जारी करण्यात येणार असल्याचेही सीबीईची प्रमुखांनी सांगितले आहे.  

सरना यांनी सांगितले की, “ “नवी कर प्रणाली उद्योग जगताने चांगल्या पद्धतीने समजून घ्यावी, अशी सरकारची इच्छा आहे. सुरुवातीला माहिती नसल्याने काही चुका होतील. त्यामुळे नियमांचे पालन करण्यासाठी सुरुवातीचे सहा महिने अधिकारी कडक कारवाई करणार नाहीत. उद्योगाच्या अडचणी दूर करण्याचा सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  ट्विटर अकाउंटवर दररोज १३,००० प्रश्न येत आहेत.  यासाठी १८ कमिट्या बनवल्या आहेत.’
बातम्या आणखी आहेत...