आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेग क्षेत्राकडून व्याजदर कपातीच्या निर्णयाचे स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी अापल्या पहिल्या नाणेनिधी धाेरण अाढाव्यात व्याजदरामध्ये केलेल्या पाव टक्के कपातीचे उद्याेग क्षेत्राने स्वागत केले अाहे. व्याजदर ठरवण्यासाठी नेमण्यात अालेल्या समितीने याेग्य निर्णय घेतला असून अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या दृष्टीने ताे महत्त्वपूर्ण अाहे. बँकांचे व्याजदर कमी हाेऊन त्यामुळे गृहकर्जाची मागणी वाढण्यास मदत हाेऊ शकेल, असे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केले अाहे. व्याजदर निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकारमध्ये झालेल्या करारानुसार अलीकडेच स्थापन करण्यात अालेल्या समितीने प्रमुख व्याजदरात पाव टक्क्याने कपात करण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदर पाव टक्क्याने कमी करून ताे ६.२५ टक्के अशा सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर अाला अाहे.

सरकारने केले स्वागत : रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होईल, असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी सांगितले. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केले. तर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे देशातील महागाई कमी होणार असून भारतीय अर्थ व्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत होणार असल्याचे अर्थ सचिव अशोक लवासा यांनी व्यक्त केले आहे.

ऊर्जा मंत्री पीयूष गाेयल यांनी या बहुप्रतीक्षित व्याजदर कपातीमुळे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यासह पतधोरण आढावा समितीचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना लागू करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मतही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरकपात अपेक्षितच
महागाईचे प्रमाण कमी झाल्यामुळे व्याजदर कपात अपेक्षितच हाेती. चांगला मान्सून अाणि पेरण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे महागाई घटून ती अपेक्षित पातळीत अाली अाहे. पायाभूत क्षेत्रावर सरकारकडून हाेत असलेल्या खर्चामुळे अाैद्योगिक क्षेत्रालाही गती मिळत अाहे. प्रकल्प अनुशेष भरून काढण्याची प्रक्रिया पाेलाद अाणि सिमेंट क्षेत्रासाठी सकारात्मक ठरत अाहे. - शांती एकंबरम, अध्यक्ष , कन्झ्युमर बँकिंग, काेटक महिंद्रा बँक

अार्थिक वाढीला गती मिळेल
ऊर्जित पटेल यांचे पहिले नाणेनिधी धाेरण हे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणेच अाहे. व्याजदरात पाव टक्क्याने झालेली कपात हे राेकड सुलभतेची स्थिती चांगली असल्याचे द्योतक अाहे. या िनर्णयामुळे अार्थिक वाढीला गती िमळण्याबराेबरच गृहकर्जाच्या मागणीलादेखील चालना मिळण्यास मदत हाेणार अाहे. - गगन बांगा, व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष, इंडिया बुल्स हाउसिंग

व्याजदर कपात महत्त्वाची
व्याजदर कपात अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत गरजेची हाेती. ग्राहक किमतीवर आधारित महागाई अाॅगस्ट महिन्यात कमी झाली. पाऊस चांगला झाल्यामुळे अन्नधान्य अाणि भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या असून महागाईचा ताण लवकर वाढण्याची शक्यता कमी अाहे. महागाईचा घटता कल राहिला. या वर्षाच्या अखेरपर्यंत पुन्हा व्याजदरात पाव टक्का कपात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारी राेख्यांमुळे बँकांवरील निधी खर्चाचा भार कमी हाेऊन त्याचे रूपांतर बँकांचे व्याजदर कमी हाेण्यात हाेईल. - दिनेश ठक्कर, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, एंजेल ब्राेकिंग

शेअर बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ९१ अंकांच्या वाढीसह २८२३३४ च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ३१ अंकांच्या वाढीसह ८७६९ च्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...