आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात लवकरच येऊ शकते 1000 ची नवी नोट, RBI ने सुरू केली नोटांची छपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजार रुपयांची जुनी नोट. आरबीआय लवकरच हजार रुपयांची नवी नोट आणणार आहे. - Divya Marathi
हजार रुपयांची जुनी नोट. आरबीआय लवकरच हजार रुपयांची नवी नोट आणणार आहे.
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक आणि सरकारने 1000 रुपयांच्या नव्या नोटा लाँच करण्याची तयारी केली आहे. जानेवारी महिन्यातच या नव्या नोटा जारी करम्यात येणार होत्या, पण 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा करण्यासाठी ते टाळण्यात आले. 

निश्चित तारीख माहिती नाही 
- इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्सप्रेस’नुसार 8 नोव्हेंबरला बंद करण्यात आलेल्या 1000 रुपयांच्या जुन्या नोटांच्या ऐवजी नव्या नोटा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- RBI ने या नोटांची छपाईदेखिल सुरू केली आहे. 
पण या नोटा चलनात कधी येणार हे मात्र अद्याप निश्चित नाही. 

9.92 लाख कोटींच्या नोटा चलनात 
- 8 नोव्हेंबरला नोटबंदीच्या दरम्यान 15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर गेल्या होत्या. 500-1000 च्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. 
- या नोटांऐवजी 500-2000 च्या नव्या नोटा चलनात आल्या होत्या. नवीन डिझाइन आणि रंगाच्या या नोटांवर अधिक सेक्युरिटी फिचर्स आणि मंगळयानाचे चित्रही होते. 
- RBI चे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांनी 8 फेब्रुवारीला सांगितले होते की, 500-2000 च्या 9.92 लाख कोटींच्या नोटा 27 जानेवारीपर्यंत चलनात आल्या होत्या. 

13 मार्चपासून सेव्हींग अकाऊंमधून पैसे काढण्याची मर्यादा हटणार 
- 20 फेब्रुवारीपासून सेव्हींग अकाऊंटमधून एका आठवड्यात 24 हजारांऐवजी 50 हजार रुपये काढता येतील. 
- पत धोरणाचा आढावा जाहीर करताना आरबीआयकडून ही माहिती देण्यात आली होती. 
- 13 मार्चनंतर तर पैसे काढण्याची मर्यादा पूर्णपणे हटवली जाणार आहे. 
- आरबीआयने 1 फेब्रुवारी पासून एटीएम, करंट अकाउंट्स, कॅश क्रेडीट अकाउंट्स आणि ओव्हरड्राफ्ट अकाउंट्समधून पैसे काढण्याची मर्यादा हटवली होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...