मुंबई - घाऊक महागाई आॅगस्टमध्ये आणखी कमी हाेऊन ४.३ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करू शकते, असा अंदाज ‘मुडीज’ या जागतिक पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे.
घाऊक किमती वार्षिक आधारावर कमी हाेऊन ४.३ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. मागील महिन्यात या महागाईमध्ये अनपेक्षित घट हाेऊन ती ४.१ टक्क्यांवर आली हाेती. ऊर्जा आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीतील घट कमी असून अन्नधान्याच्या किमतीतही लक्षणीय घट हाेण्याची शक्यता असल्याचे मत मुडीजने व्यक्त केले आहे.
किरकाेळ महागाईदेखील जुलै महिन्यात विक्रमी घसरून ३.७८ टक्क्यांवर आली आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करण्यासाठी काहीसा विराम घेतला हाेता. पण महागाई सातत्याने कमी हाेत असल्याने िरझर्व्ह बँक या वर्षात आणखी व्याजदर कमी करेल, असे मुडीजने म्हटले आहे.
आर्थिक वृद्धी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदर कमी करावे, अशी उद्याेग क्षेत्राचीही मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबराेबर उद्योगजगाताच्या अलीकडेच झालेल्या बैठकीतही उद्याेगांनी ही मागणी उचलून धरली. महागाईबराेबरच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी हाेत असून त्याचा विचार करून रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करेल, अशी अपेक्षा अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही व्यक्त केली.