नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) नवनिर्वाचित गव्हर्नर उर्जित पटेल यांनी मंगळवारी आपल्या कार्यकाळातील पहिले पतधोरण जाहीर केले आहे. पटेल यांनी देशातील जनतेला खुशखबर दिली आहे. ती म्हणजे, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये प्रत्येकी पाव टक्क्याने (.25%) पाव टक्क्यांनी कपात केली आहे.
दिवाळीच्या तोंंडावर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज अशी विविध कर्जे स्वस्त होण्याचे संकेत उर्जित पटेल यांनी दिले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून देशातील इतर बँकांना होणारा वित्तपुरवठा आता 6.25 टक्के दराने होणार आहे. आधी हा दर 6.50 टक्के होता. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपो दरातही पाव टक्क्याने कपात करण्यात आली आहे. हा दर 6 टक्क्यांवरून 5.75 टक्के करण्यात आला आहे.
6.25 टक्के हा गेल्या 6 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे. आरबीआयच्या या निर्णयााने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जानेवारी ते मार्च या तिमाहीत महागाईचा दर 5.3 टक्के होता.
होम लोनवर किती कमी होईल तुमची ईएमआय...
कर्जाची रक्कम |
ईएमआय 9.50% |
ईएमआय 9.25% |
बचत (वाार्षिक) |
25 लाख |
26,105 |
25,730 |
4500 |
50 लाख |
52,211 |
51,460 |
9012 |
(टीप: फायनल आकडेवारी बँकांंनी व्याजदरात कपात केल्यानंतर समोर येईल.)
स्टार्टअप्ससाठी महत्त्वपूर्ण निर्णय...
- आरबीआयने स्टार्टअप्ससाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
- आरबीआय सांगितले की, एखाद्या स्टार्टअप्ससाठी एका वर्षात विदेशी मार्केटमधून 30 लाख डॉलर (जवळपास 20 कोटी रुपयेे) मिळवू शकतो.
पुढील स्लाइडवर वाचा...
>पतनिर्धारण समितीच्या (Monetary Policy Commitee) सहा सदस्यांनी व्याजदर कमी करण्यासाठी नोंंदवले मत....
> गेल्या 6 वर्षातील सर्वात कमी व्याजदर...
> रेपो रेट म्हणजे काय?
> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?