आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवढ्या लवकर ‘कातडी जाड’ होईल तेवढे चांगले : गव्हर्नर पटेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - नोटाबंदीनंतर आता भारतीय अर्थव्यवस्थेत ‘शार्प व्ही रिकव्हरी’ येईल, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केले. खुले व्यापार धोरण भारतासाठी उपयोगी सिद्ध झाले असल्याचेही मत त्यांनी मांडले.
 
‘शार्प व्ही रिकव्हरी’मध्ये तेजीत घसरणीनंतर अर्थव्यवस्था त्याच गतीने वर जाते. नोटाबंदी लागू करण्याच्या पद्धतीवर अनेक टीकाकारांच्या टीका सहन कराव्या लागल्यानंतर पटेल यांनी शुक्रवारी या विषयावर संवाद साधला. कर्तव्य पूर्ण करताना जेवढ्या लवकर आपली कातडी जाड होईल तितके चांगले असल्याचेही त्यांनी सांगितले.  

ऊर्जित पटेल यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी दिसत असून यावर जवळपास प्रत्येक व्यक्ती सहमत आहे.  काही कालावधीसाठी यामध्ये घसरण येण्याचीही शक्यता आहे. नोटाबंदीचा निर्णय अचानक आणि तेजीत घेण्यात यावा हा नियोजनाचाच एक भाग होता असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
 
कमोडिटीमुळे दरवाढ  
जागतिक बाजारात कमोडिटीच्या दरामध्ये सलग दरवाढ होत असून भारतासारख्या विकसनशील देशांसाठी ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कमोडिटीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे महागाई दर वाढत असल्याचे पटेल यांनी सांगितले. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये जागतिक पातळीवर चांगला विकास दर राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
ट्रम्प यांच्या धोरणाची चिंता  
अमेरिकेचे नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे संरक्षणवादी धोरण चिंताजनक असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केले. ही जगासाठी मोठी चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीला या धोरणामुळे संरक्षण मिळेल असे मला वाटत नाही, मात्र जगभरातील बाजारांवर या धोरणाचा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
 
९ टक्के विकास दर कधी, याचे उत्तर सांगणे अवघड  
{ सलग विकास दर काय राहील हे सांगणे अवघड आहे. पायाभूत सुविधांत, विशेषकरून रोजगार क्षेत्रात वाढ होईल, त्या वेळी चांगला विकास दर साध्य करण्यास मदत मिळेल, असे मत पटेल यांनी मांडले.  
{ भारत ९ टक्के विकास दर कधी साध्य करेल याविषयी निश्चित सांगणे अवघड असल्याचे ते म्हणाले.  
{ सध्या काही क्षेत्रांत आपण करत असलेल्या प्रगतीमध्ये तेजी आणण्याची आवश्यकता आहे. मात्र, ७.५ टक्के विकास दर निराशाजनक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   
{ पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांच्या पतधोरण समितीने गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यात व्याजदर ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.  
{ विकास साध्य करण्यासाठी महागाई दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक करत असल्याचे पटेल यांनी सांगितले.  
{ काही देशांत महागाई दर जास्त असूनही विकास दर चांगला आहे. मात्र, आपल्या देशात ही स्थिती हळूहळू साध्य करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...