आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटेलांना राजन यांनी सुपूर्द केली सूत्रे; कमी व्याजदराबाबत राजन यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून ऊर्जित पटेल यांनी मंगळवारी झालेल्या छोटेखानी पदग्रहण समारंभानंतर गव्हर्नर म्हणून आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे.

अत्यंत छोटेखानी झालेल्या या समारंभात मीडियालादेखील आमंत्रित करण्यात आले नाही. त्यासोबतच तीन वर्षांपूर्वी आपल्या कामाला सुरुवात करणाऱ्या रघुराम राजन यांनाही निरोप देण्यात आला आहे. त्यांचा निरोप सोहळा रविवारी चार सप्टेंबरलाच साजरा झाला असला तरी सोमवारी विनायक चतुर्थीची सुटी असल्यामुळे ऊर्जित पटेल यांनी मंगळवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत गव्हर्नर पदग्रहणाच्या वेळी मीडियाची उपस्थिती राहण्याची परंपरा आहे. हा समारंभ सार्वजनिकरीत्या साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्वच मीडिया या वेळी उपस्थित राहतो. तीन वर्षांपूर्वी रघुराम राजन यांना डी. सुब्बाराव यांनी पद सुपूर्द केले त्या वेळीदेखील मीडियाची उपस्थिती होती.

पुढील स्लाइडवर वाचा, कमी व्याजदराबाबत राजन यांचा जगाला इशारा

बातम्या आणखी आहेत...