आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Government Was Saying Demonization Got A Lot Of Money, RBI Said Loans Will Be Cheaper Yet Not All Uncertain, Impossible To Cut Interest Rates

सरकार म्हणाले, नोटबंदीने कर्ज स्वस्त होतील; आरबीआय म्हणाली, व्याजदर कपात अशक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली : सर्वांच्या अपेक्षांच्या विपरीत रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात कोणतीच कपात केली नाही. गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी रेपो दर ६.२५% कायम ठेवला. नोटबंदीमुळे बँकांत खूप पैसा आल्याने व्याजदर अर्धा टक्का कमी होईलच, असे सरकार व बँका वारंवार सांगत होते.
मात्र सध्या सर्वकाही अनिश्चित आहे, दर कपात अशक्य आहे, असे आरबीआयने म्हटलेे. आरबीआयने विकासदराचा अंदाजही ७.६% हून घटवून ७.१% केला. त्याचा परिणाम बाजारावर दिसला. सेन्सेक्स १५६ अंकांनी कोसळला.
सर्व केंद्रीय मंत्री, ११ बँकांचे प्रमुख व ६० अर्थशास्त्रज्ञांनी केला
होता कर्ज स्वस्ताईचा दावा... पण रिझर्व्ह बँकेने दिली ही 3 कारणे
1 नोटबंदीमुळे उद्योग सुस्त, वेतन देणे कंपन्यांना झाले अशक्य अनिश्चितता वाढली. डिसेंबरपर्यंत उद्योग सुस्त राहतील. असंघटीत व बांधकाम, वाहतूक, हॉटेलसारखी क्षेत्रे जास्त प्रभावित.नोटबंदीचा परिणाम समजून घेणे आवश्यक.
2 महागाई ५% ने वाढते आहे, ४% प्रमाणे धोरणे आखायची मार्च २०१७ पर्यंत किरकोळ महागाई ५% राहील. ४% चे लक्ष्य गाठण्यासाठी धोरणे ठरवायला सांगितलेे.७ व्या वेतन आयोगाच्या दिलेल्या थकबाकीचे आकलन बाकी आहे.
3 फेड रिझर्व्ह व्याजदर वाढीचा होईल भारतावर परिणाम अमेरिकेत फेडरल रिझर्व्हची बैठक पुढच्या मंगळवारी-बुधवारी होईल.व्याजदर वाढीची शक्यता आहे. त्यामुळे भारतासारख्या देशातून गुंतवणूकदार पैसे काढून घेतील.
एमसीएलआर व्यवस्था एप्रिलपासून लागू आहे. त्यात बँका खर्चावर आधारित दरमहा कर्जावर व्याज ठरवते.तेव्हापासून गृहकर्ज ०.४५% स्वस्त झाले आहे. पण फायदा नव्या ग्राहकांनाच मिळतो. रेपो दर घटला तरच बँका बेस रेट कमी करतात. त्यामुळे जुनी कर्जेही स्वस्त झाली असती.

... आणि बँकांच्या अडचणी : १००% सीआरआर नियमाने बँकांचा खर्च वाढला. त्यामुळे कर्ज स्वस्त करणे कठीण आहे. नोटबंदीमुळे पैसे आले आहेत. पण निर्बंध उठताच लोक पैसे काढतील.तेव्हाच किती जास्तीचा पैसा आला ते कळेल.

रु.१२ लाख कोटी जमा झाले, पण फक्त २२% नोटा चलनात आल्या
- नोटबंदीनंतर आजवर बँकांत लोकांचा किती पैसा आला आहे?
नोटबंदीमुळे १४.५ लाख कोटींच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.
आजवर सुमारे ८२% म्हणजे ११.८५ लाख कोटी रुपये बँकांत जमा झाले आहेत.
- ८२% रक्कम बँकांत आली आहे.
आणखी २३ दिवस मुदत आहे.मग व्यवस्थेत काळा पैसा नाही का?
ऊर्जित पटेलांनी उत्तर टाळले. म्हणाले- नोटबंदीचे दीर्घकालीन लाभ होतील.
- बाजारात किती चलन आले आहे?
नोटांची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व प्रेस ५०० व १००० च्या नोटांच्या हिशेबाने रिकॅलिब्रेट केल्या. आजवर ४ लाख कोटींच्या नोटा जारी झाल्या आहेत. नव्या नोटांची छपाई वेगाने सुरू आहे. लोकांनी साठेबाजी करू नये, असे आवाहन आहे.

- मग नोटबंदी घाईत केली का?
नाही. निर्णय घाईत झाला नाही. सामान्य लोकांच्या अडचणींवर सरकारशी चर्चा झाली. सामान्यच आधी रडारवर होते.
- नोटा जमा करण्याची मुदत वाढेल?
सध्या तरी ३० डिसेंबरची मुदत आहे. गरजेप्रमाणे या मुदतीचे पुनरावलोकन केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...