आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI ने 6 % रेपो रेटसह जैसे थे ठेवले व्याजदर, कर्ज स्वस्त होण्यासाठी पाहावी लागणार वाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून त्यात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी (एमपीसी) ने रेपो रेट 6% आणि रिव्हर्स रेपो रेट 5.75% कायम ठेवला आहे. 

 

महागाई वाढण्याची शक्यता
- आरबीआयच्या मते राज्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, पेट्रोलियम पदार्थांवर एक्साइज ड्युटी आणि व्हॅट कमी होणे, तसेच जीएसटी दर घटल्याने रेव्हेन्यू कमी झाला आहे. त्यामुळे वित्तीय तूट वाढू शकते आणि त्यामुळे महागाई वाढू शकते. 
- रिझर्व्ह बँकेने बँकांना म्हटले आहे की, त्यांनी आधी झालेल्या कपातीचा ग्राहकांना अधिकाधिक फायदा देत अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलाचा फायदा उचलावा. 


एमपीसी पाच सदस्यांचे एकमत 
- पतधोरण समिती म्हणजेच एमपीसीच्या ५ सदस्यांनी व्याजदर जैसे थे ठेवण्याची शिफारस केली होती. तर एकाने 25 बेसिस पॉइंट कमी करण्याचा सल्ला दिला होता. एमपीसीची पुढील बैठक ६ पेब्रुवारी 2018 ला होईल. 
- रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, महागाई 4 टक्क्याच्या आसपास ठेवण्यासाठी आणि ग्रोथ सपोर्टसाठी दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महागाई 7 महिन्यांच्या उच्चांकावर
ऑक्टोबर महिन्यात महागाई 7 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यांमध्ये अन्न पदार्थांच्या दरामध्ये अनेक चढउतार जाले. सप्टेंबरमध्ये महागाई कमी झाली. पण ऑक्टोबरमध्ये तेजी आली. भाज्या आणि फळांच्या दरात वाढ झाल्याने तसे झाले. तसेच एलपीजी, केरोसीन आणी वीज दरात वाढ झाल्यानेही असे घडले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...