आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज अारबीएल बँकेचा आयपीओ खुला होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खासगी क्षेत्रातील आरबीएल बँक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवारी खुला होणार आहे. बँकेने इश्यूसाठी २२४ ते २२५ रुपये प्राइस बँड निश्चित केले आहे. आयपीओच्या माध्यमातून १२०० कोटी रुपये जमा करण्याची बँकेची योजना आहे. यामध्ये ८३२.५० कोटी रुपये नवे शेअर जारी करून आणि ३८०.४६ कोटी रुपये सध्याच्या शेअरधारकांकडून ‘ऑफर फॉर सेल’ जमा करण्याची आशा आहे.

बँक या रकमेचा उपयोग व्यवसाय विस्तारासाठी करेल. या आयपीओद्वारे बँक आपली ११ टक्के भागीदारी विकेल. यानंतर बँकेचे मूल्य वाढून १२,००० कोटी रुपये होईल. हा आयपीओ मंगळवारी (२३ ऑगस्ट) बंद होईल. गेल्या दहा वर्षांत कोणत्याही खासगी क्षेत्रातील बँकेचा हा पहिला आयपीओ आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विश्ववीर आहुजा यांनी ही माहिती दिली. आहुजा म्हणाले, आरबीएल बँकेने (आधीची रत्नाकर बँक) राज्य बँकेतून राष्ट्रीय व व्यावसायिक बँकेच्या रूपात बदल घडवून आणण्यात लक्ष केंद्रित केले आहे. केवळ सहा वर्षांत स्वत:ला नव्या जमान्यातील बँकेच्या रूपात स्थापन करण्यात यश मिळवले. हा एक आदर्श आहे. देशात १६ राज्यांमध्ये याच्या १९७ इंटरकनेक्टेड ब्रँच आणि ३६२ एटीएम आहेत. या सर्वांशी जवळपास १९ लाख ग्राहक जोडले आहेत. बँकेत एनपीएचे प्रमाण खूप कमी आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए ०.९८ % आणि नेट एनपीए ०.५९% आहे. आहुजा म्हणाले, सध्या शाखांचे जाळे महाराष्ट्र आणि कर्नाटकपर्यंत आहे. याचा विस्तार देशातील अन्य राज्यांत करण्याची इच्छा आहे. आयपीओनंतर आरबीएल बँक आपल्या शाखांचे नेटवर्क गतीने विस्तारणार आहे.

प्रस्तावाआधी ३६४ कोटी रूपये जमा
आरबीएल बँकने इश्यूच्या एक दिवस आधी गुरुवारी २५ अँकर गुंतवणुकदारांचे शेअर विकून सुमारे ३६४ कोटी रुपये उभे केले आहेत. संबंधित गुंतवणुकदारांना १.६१ कोटींहून जास्त समभाग वाटप करण्याचे ठरवले आहे. बँकेने ही माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...