आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio लॉचिंगच्‍या 13 दिवसानंतर अनिल अंबानीच्‍या आरकॉम-एअरसेलचे विलीनीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि एअरसेलचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. आरकॉम ९.८७ कोटी युजर्ससह देशातील चौथी मोठी दूरसंचार कंपनी आहे, तर एअरसेलचे ८.८९ कोटी युजर्स आहेत आणि ती देशातील सहावी मोठी दूरसंचार कंपनी आहे. या विलीनीकरणानंतर ६५,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह जी नवीन कंपनी अस्तित्वात येईल ती १८.७६ कोटी युजर्ससह आयडियाला चौथ्या स्थानावर ढकलत तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरेल. सध्या देशात २५.५ कोटी युजर्ससह भारती एअरटेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर १९.९ कोटी युजर्ससह व्होडाफोन दुसऱ्या तर १७.६ कोटी युजर्ससह आयडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आरकॉमच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी एअरसेलमध्ये विलीनीकरणाच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ही विलीनीकरणाची प्रक्रिया २०१७ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. मलेशियाच्या मॅक्सिस कम्युनिकेशन्सजवळ एअरसेलची मालकी आहे.

आरकॉम आणि एअरसेलचे हे विलीनीकरण अनिल यांचे मोठे बंधू आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या वतीने रिलायन्स जीओ बाजारात दाखल करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी झाले आहे. आरकॉमने काही एअरवेव्ससाठी रिलायन्स जीओसोबत करार
केला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या कंपनीकडे किती दूरसंचार ग्राहक
बातम्या आणखी आहेत...