आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या ग्राहकांना सेवा देत नसल्याचा जिओचा अन्य प्रमुख कंपन्यांवर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिलायन्स आणि अन्य दूरसंचार कंपन्यांतील वादावर सध्या तोडगा निघण्याची शक्यता दिसत नाही. दूरसंचार नियामक मंडळ अर्थात ट्रायने शुक्रवारी िजओ, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक केली. सेवेतील गुणवत्तेशी तडजोड करता कंपन्यांनी या वादावर तोडगा काढावा, असे ट्रायचे सचिव सुधीर गुप्ता यांनी या सर्व कंपन्यांना सांगितले. तरी सुद्धा कंपन्यांतील या वादावर काहीच तोडगा निघाला नाही.

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलकडून सांगण्यात आले की, “फ्री ट्रॅफिकच्या सुनामी’ मुळे नेटवर्कचा गैरवापर होऊ नये याकडे ट्रायने लक्ष द्यावे. जानेवारीपासून जेव्हा रिलायन्स जिओ सेवांची किंमत वसूल करणे सुरू करेल तेव्हा ट्रॅफिक संतुलित होऊन जाईल. दरम्यान, जुन्या कंपन्या आपल्या ग्राहकांना नेटवर्कवर कॉलच्या योग्य सुविधा देत नसल्याची जिओची तक्रार आहे. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत दूरसंचार कंपन्यांची संस्था सीआेएआयला मात्र दूरच ठेवण्यात आले. सीआेएआयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांच्या मते, रिलायन्स जिओने यासाठी ट्रायवर दबाव टाकला होता आणि ट्रायनेही जिओचे मत मान्य केले होते. सूत्रांच्या मते, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाचे अधिकारी लवकरच या प्रकरणी बैठकीचे आयोजन करणार आहेत. या बैठकीत रिलायन्स जिओचे प्रकरण नेमके कसे हाताळावे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कंपनी जिओशी इंटरकनेक्शनसाठी वेगवेगळे द्विपक्षीय करारही करू शकते.

गरजेपेक्षा नऊपट कमी पोर्ट करत आहेत कंपन्या : रिलायन्स
एकादूरसंचार कंपनीच्या नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कवर फोन केला जातो तेव्हा त्यासाठी इंटरकनेक्शन पाॅइंटची गरज असते. नियमानुसार यासाठी दोन्ही कंपन्यांना करार करावा लागतो. यात वाद झाल्यास प्रकरण ट्रायकडे जाते.

अन्य कंपन्या ग्राहकांसाठी पुरेसे इंटरकनेक्शन पोर्ट देत नसल्याची तक्रार रिलायन्स जिओने सप्टेंबर रोजी सेवा सुरू केल्यापासून अनेकदा केली आहे. १८ ऑगस्ट रोजी रिलायन्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २.२ कोटी ग्राहकांसाठी इंडस्ट्री मानकांनुसार १२ हजार ५०० पोर्ट किंवा इंटरकनेक्शन पॉइंटची गरज असेल. मात्र, अव्वल तीन कंपन्यांनी फक्त १४०० पोर्टच दिले आहेत.

जिओच्या सांगण्यावरून आम्हाला दूर ठेवले : सीआएआय
जिओच्या सांगण्यावरून ट्रायने आम्हाला बैठकीपासून दूर ठेवले. ट्राय रिलायन्सच्या दबावात काम करत आहे, असा आरोप सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनचे (सीओएआय) महासंचालक राजन एस. मॅथ्यूज यांनी केला आहे. मात्र, जिओचे प्रतिनिधी नाहटा यांनी हे आरोप फेटाळून लावले. ज्यांना बोलावण्यात आले त्यांनी बैठकीला यावे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, मागच्या महिन्यात सीआएआयने ट्रायवर भेदभावाचा आरोप केला होता आणि नंतर माफीही मागितली होती. जिओसुद्धा सीआेएआयचा सदस्य आहे. मात्र, त्यांची धोरणे याहून वेगळी आहेत.

ग्राहकांसाठी न्यायाची लढाई असल्याचे जिओचे मत
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे प्रतिनिधी महेंद्र नाहटा यांनी ट्रायकडे बाजू मांडल्यानंतर सांगितले की, ही ग्राहकांच्या न्यायाची लढाई आहे. आम्ही अन्य दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून योग्य प्रमाणात इंटरकनेक्शनची मागणी करत आहोत आणि याबाबत आम्ही ट्रायला संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता ट्रायला याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. निर्णयाबाबत ट्रायने कोणतीही मुदत दिलेली नाही.

महिन्यांची नि:शुल्क सेवा नेमकी कशी?
जिआेने त्यांच्या सेवांचा व्यावसायिक शुभारंभ केला आहे काय, असा प्रश्न एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाने केला आहे. याचे उत्तर हो असल्यास जिओला ९० दिवसांपेक्षा अधिक काळ नि:शुल्क सेवा देता येणार नाही. जिओने सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या योजनेनुसार ३१ डिसेंबरपर्यंत नि:शुल्क सेवा देण्याची योजना आणली आहे.
बातम्या आणखी आहेत...