आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio अनलिमिटेड फ्री डेटा ऑफरविषयी जाणून घ्या हे सत्य, बसेल धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स जिओच्या स्मार्ट ऑफर्सविषयी देशभरात चर्चेला अक्षरश: ऊत आला आहे. जिओचे 4G सिम खरेदी करण्यासाठी स्मार्टफोन यूजर्समध्ये प्रचंड क्रेज आहे. आता तर कंपनीने 5 सप्टेंबरपासून रिलायन्स JIO 4G सिम रिटेलरकडे उपलब्ध करून दिले आहे. पण, खरंच रिलायन्स ग्राहकांना अनलिमिटेड फ्री डेटा देत आहे काय? हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना!

रिलायन्सने जिओच्या लॉन्चिंगदरम्यान ग्राहकांना देण्यात आलेल्या अनलिमिटेड फ्री डेटा ऑफर्सविषयी अनेक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नाहीत. तुम्ही जेव्हा कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन टॅरिफ डीटेल पाहाल तेव्हा तुमच्या सगळे लक्षात येईल.

चला तर मग जाणून घेऊ या... Reliance Jio अनलिमिटेड फ्री डेटा ऑफरविषयी धक्कादायक सत्य...

1. नाही मिळणार अनलिमिटेड डेटा-
ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा दिला जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यात 4 GB ची लिमिट आहे. ग्राहक दिवसभरात केवळ 4 GB डेटा वापर करू शकतात. 4 GB नंतर डेटा स्पीड कमी होऊन 128Kbps होईल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रिलायन्स Jioच्या अनलिमिटेड फ्री डेटा ऑफरविषयी धक्कादायक सत्य...
बातम्या आणखी आहेत...