आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio चा आता \'धन धना धन\' प्लान, 309 रुपयांत 3 महिने मिळणार सर्व काही मोफत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क - रिलायन्स जिओच्या ज्या यूझर्सना प्राइम मेंबरशिपबरोबर समर स्पेशल ऑफर मिळवता आली नव्हती, त्यांच्यासाठी आता जिओने 'धन धना धन' ऑफर आणली आहे. यूझरला या प्लॅनसाठी 309 किंवा 509 रुपये खर्च करावे लागतील. दोन्ही ऑफर्समध्ये अनलिमिटेड डाटासह फ्री कॉलिंग आणि फ्री रोमिंगचा समावेश असेल. ही ऑफर प्राइम यूझर आणि नॉन प्राइम यूझर सर्वांसाठी असेल. 

काय आहे धन धना धन ऑफर 
- जिओ धन धना ऑफरमध्ये यूझर्सना रोज 1GB ते 2GB पर्यंत डाटा मिळेल. 
- 309 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्राइम मेंबर्सना 84 दिवस रोज 1GB 4G डाटा मिळेल. 
- तर 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्राइम मेंबर्सना 84 दिवस रोज 2GB 4G डाटा मिळेल. 
- रोजची मर्यादा संपल्यानंतर स्पीड 128kbps होईल. 
- दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री रोमिंग आणि फ्री SMS मिळू शकतील. 

नवीन यूझर्सना द्यावे लागतील 99 रुपये अधिक 
- धन धना धन ऑफरसाठी नव्या यूझर्सना 408 रुपये आणि 608 रुपये खर्च करावे लागतील. 
- त्यात 99 रुपये प्राइम मेंबरशिपचे असतील. म्हणजेच 408 रुपयांत 1GB 4G डाटा आणि 608 रुपयांत 2GB 4G डाटा मिळेल. 

समर ऑफरवर होता ट्रायचा आक्षेप 
- ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने 6 एप्रिलला रिलायन्स जिओच्या फ्री समर सरप्राइज ऑफर आणि प्राइम मेंबरशिपची तारीख वाढवण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. 
- सोबतच दोन्ही ऑफर्स बंद करण्याचा सल्लाही दिला होता. त्यानंतर ट्रायने निर्देश पाळण्यासही सांगितले होते. 
- कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले होते की, ट्रायच्या सल्ल्यानुसार आम्ही समर सरप्राइज ऑफर आणि प्राइम मेंबरशिप लवकरच बंद करणार आहोत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...