आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक कर्ज परतफेड होणार सोपी, रिझर्व्ह बँकेची नियम बदलण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शैक्षणिक कर्जाबाबत वाढत असलेला एनपीए (अडकलेले कर्ज) पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने "फ्लेक्झिबल एज्युकेशन कर्ज योजना' यामध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे शैक्षणिक कर्ज घेताना युवकांना अनेक सुविधा मिळणार आहेत.

शैक्षणिक कर्ज घेतलेल्या ज्या युवकांना कमी पगाराची नोकरी मिळेल, अशा युवकांचा कालावधी वाढवून त्यांना कमी ईएमआय भरण्याची सुविधा देण्यात येईल. तसेच ज्या युवकांना जास्त पगाराची नोकरी लागली, अशा युवकांचा कर्ज परतफेड करण्याचा कालावधी कमी करून त्यांचा ईएमआय वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे. तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या युवकांना लवकर नोकरी मिळणार नाही, अशा युवकांसाठी मॅारेटोरियम कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. या योजनेला कर्ज परतफेड करण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगारासोबत जोडले जाणार आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इकॉनॉमिक काॅन्क्लेवमध्ये मार्गदर्शन करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. या नवीन प्रस्तावानुसार युवकांना आॅटोमॅटिक मॉरेटोरियमचा काळ वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती देखील राजन यांनी या वेळी दिली.

एनपीए वाढला
शैक्षणिक कर्जाची परतफेड मिळवणे आमच्यासाठी मोठी अवघड समस्या बनली असल्याचे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले. यामुळे यातील एनपीए सलग वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे याबाबत आधार कार्डचा वापर करण्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेत बदल करून योजना अधिकाधिक लवचिक करण्यावर आमचा भर असणार आहे, असेही राजन यांनी सांगितले.