आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच चलनात येतील 10 व 100 रुपयांचे विशेष नाणी, जाणून घ्या वैशिष्ट्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांनंतर आता लवकरच बाजारात 100 रुपयांचेही नाणे पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनानिर्मित देशात 100 रुपयांचे विषेश नाणे जारी केले आहे.

विशेष नाण्याच्या एका बाजुला जागतिक योग दिनाचे प्रतीकचिन्ह आणि दुसर्‍या बाजुला मुल्य अंकित करण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया लवकरच 100 रुपयांचे चकचकत नाणे चलनात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

100 रुपयांच्या नाण्याचे खास वैशिष्ट्य...
100 रुपयांच्या नाण्याचे खास वैशिष्‍ट्य सांगायचे झाल्यास हे नाणे 80 टक्के चांदी (सिल्व्हर) आणि 20 टक्के तांब्याच्या (कॉपर) मिश्रणातून तयार झाले आहे. या नाणेचे एकूण वजन 35 ग्रॅम आहे.
10 रुपयांचे नाणेही जारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून 10 रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे. मात्र, भारत सरकारने याआधीच 10 रुपयांचे नाणे चलनात आणले आहेत. रिझर्व्ह बॅंक लवकरच 10 रुपयांचे विशेष नाणे चलनात उतरवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 10 रुपयांच्या नोट चलनातून बाद होणार आहेत. या नोटांची जागा आता 10 रुपये घेणार आहे. चलनात असलेली 10 रुपयांच्या नोट खिशात ठेवून लवकर जिर्ण होतात. तसेच नोटा छापाईची प्रक्रिया अत्यंत महागडी आहे. परिणाम, आरबीआयने 10 रुपयांचे नाणे चलनात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 10 रुपयांच्या नव्या नाण्याचे वैशिष्‍ट्ये...
बातम्या आणखी आहेत...